जगातील सर्वात उंच गुरुद्वारासमोर नृत्य सादरीकरुन करुन अभिनेत्री-नृत्यांगणा मीरा जोशीचा जागतिक विक्रम, १५ हजार १९७ फूट उंचीवर नृत्य !!

जगातील सर्वात उंच गुरुद्वारासमोर नृत्य सादरीकरुन करुन अभिनेत्री-नृत्यांगणा मीरा जोशीचा जागतिक विक्रम, १५ हजार १९७ फूट उंचीवर नृत्य !!

        सुप्रसिध्द अभिनेत्री-नृत्यांगणा मीरा जोशी यांनी सर्वात उंचावरील गुरुद्वारासमोर नृत्य सादरीकरण करण्याचा विक्रम केला आहे. हा त्यांचा दुसरा जागतिक विक्रम आहे. १५ हजार १९७ फूट उंचीवर असलेल्या जगातील सर्वात उंचावर असलेल्या गुरुद्वारासमोर हा विक्रम करण्यात आला. हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हा विक्रम नोंदवण्यात आला आहे. उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील हेमकुंड साहिब या शीख धर्मियांच्या धार्मिक स्थळी नृत्य सादर करत मीरा जोशी यांनी हा विक्रम प्रस्थापित केला.

       यासाठी त्यांना वीस किमी अंतराचा ट्रेक करावा लागला. हा ट्रेक १२ ते १५ तासांत पार करत मीरा जोशी यांनी हा विक्रम केला आहे. रात्रीच्या वेळी हा ट्रेक सुरु करण्यात आला तेव्हा त्यावेळी तापमान ३ डिग्री होते. मात्र मीरा जोशी यांनी जोरदार वारे, थंड वातावरण, पावसाची रिमझिम असतानाही हा विक्रम पूर्ण केला. तुषार सुभेदार, वरुण कवान, आनंद बनसोडे यांचे यामध्ये मोठे सहकार्य लाभले. कुटुंबियांचे व प्रेक्षकांचे नेहमी मिळणारे प्रेम माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याची भावना मीरा जोशी यांनी व्यक्त केली.

       यापूर्वी मीरा जोशी यांनी २६ जानेवारी २०२१ ला पहिला विक्रम केला होता त्यावेळी कोकणकडावर सर्वात लांब भारतीय ध्वज फडकवला होता. १५ मार्च २०२१ ला देशातील दुसरा विक्रम व जागतिक पातळीवरील पहिला विक्रम केला होता. त्यावेळी ११ हजार ३८० फूटावर असलेल्या सर्वात उंचावरील शिव मंदिरासमोर नृत्य सादरीकरण केले होते.


Batmikar
विशेष प्रतिनिधी - खलील गिरकर

Most Popular News of this Week