शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पक्ष चिन्हाबाबतचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला परवानगी !!
शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पक्ष चिन्हाबाबतचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला परवानगी !!
खरी शिवसेना व धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह कुणाचे या सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या प्रकरणात उध्दव ठाकरे यांच्या गटाला धक्का बसला असून एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलासा मिळाला आहे. शिवसेना व धनुष्य बाण या चिन्हावरील दाव्याचा निर्णय घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्याची ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
मंगळवारी दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे शिवसेना व पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. पक्ष कुणाची जहागिरदारी नाही व ८० टक्के पक्ष नेते, कार्यकर्ते पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. निवडणूक आयोगात सत्याचाच विजय होईल, असे म्हस्के म्हणाले.
तर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी आम्ही निवडणूक आयोगाकडे आमची बाजू मांडू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.