हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा !!
भारतीय जनता पक्षाचे नेते, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल चे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या, ट्रान्सपोर्ट सेलच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच त्यांना मानणाऱ्या असंख्य वर्गाने त्यांचा वाढदिवस सलामती पीर, रेम्बो अपार्टमेंट कुर्ला येथील निवासस्थानी मोठया उत्साहात व जल्लोषात वाढदिवस साजरा केला.
वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हाजी अरफात शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून "धन्यवाद मोदी जी" अभियान राबविले.
सदर अभियानात माजी मंत्री तथा आमदार आशिष शेलार, बीजेपी प्रवक्त्या श्वेता शालिनी, माजी आमदार/ वाहतूक संघटनेचे कार्याध्यक्ष मंगेश सांगळे, अभिनेत्री / वाहतूक संघटनेच्या महिला कार्याध्यक्षा ईशा कोपीकर तसेच मोठया संख्येने वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी मिळुन ४५,००० पत्रे स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिली. हाजी अरफात शेख यांनी या प्रसंगी सर्वांचे मनापासून आभार मानले.