मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्ती वाटप !!

मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्ती वाटप !!

      सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई, यांच्या वतीने, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुळगाव असलेली ज्या विद्यार्थीनी, मुंबई शहर व परिसरातील शाळा/ कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन, शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे, १० वी च्या परीक्षेत ८५ टक्के, १२ वीत ७५ टक्के -{विज्ञान व वाणिज्य शाखा), ७० टक्के -(कला शाखा) व त्याहून अधिक गुण, संपादन केले आहेत, विविध विषयाच्या कॉलेजच्या पदवी-पदविका परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थांचा संस्थेच्या वार्षिक स्नेह-संमेलनात  गौरव करण्यात येणार आहे. तरी वरील प्रमाणे यश संपादन केलेल्या विद्यार्थांनी आपल्या गुण पत्रिकेची छायांकित प्रत, संपूर्ण नाव, मुंबईतील पत्ता, गावचा  पत्ता, टेलीफोन क्र /मोबाईल क्र. सह दि. ३० ऑक्टोबर, २०२२ पूर्वी, सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई, स्टार मॉल, ३रा  मजला, न. चि. केळकर मार्ग, दादर (पाश्चिम), मुंबई ४०००२८ या पत्त्यावर पाठवावीत. 

     तसेच ज्या पालकांची मुले/मुली बी.एस.सी.(आय, टी.) /(कॉम्प्युटर), सी.ए. तसेच मेडिकल, इंजिनिअरीग, अग्रीकॅल्चर, फार्मसी, कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत, अशा गरजू व हुशार मुलांना  परत फेडीच्या अटीवर, शिष्यवृत्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी गरजू विद्यार्थ्या कडून संस्थेच्या छापील फॉर्मवर अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यानी छापील फॉर्मसाठी स्वत:चे नाव व पत्ता लिहिलेले व त्यावर पाच रुपये पोस्ट तिकीट लावलेले पाकीट व आपली पूर्ण माहिती वरील पत्त्यावर पाठवावी अथवा (सोमवार वगळून) सायं. ५ ते ७ या वेळेत कार्यालयातुन घेऊन जावे. अधिक माहितीसाठी नरेंद्र सावंत - ९९८७६८६५३२, बाळ पंडित - ९८६७७९७४४८, बाळ पताडे- ९८३३९४६९६१ यांच्याशी संपर्क साधावा. असे संस्थेचे सरचिटणीस - प्रभाकर परब यांनी आवाहन केले आहे.


Batmikar
विशेष प्रतिनिधी - खलील गिरकर

Most Popular News of this Week