आर्थर रोड येथील स्वामींच्या मठात विद्यार्थी गुणगौरव उत्साहात संपन्न !

आर्थर रोड येथील स्वामींच्या मठात विद्यार्थी गुणगौरव उत्साहात संपन्न !

        मुंबई : चिंचपोकळी पश्चिम येथील आर्थर रोडच्या श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराच्या वतीने १०वी, १२वी व पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार स्वामींच्या मठात संपन्न झाला. व्यासपीठावर कट्टा परिवाराचे अध्यक्ष- बाळ पंडित, सचिव - राजेंद्र चव्हाण, कोषाध्यक्ष- रविंद्र रेवडेकर, सह गंगाराम गायकवाड, लाडोजी परब, रवींद्र आंबेकर, गजानन रेवडेकर, दयानंद महाजन व जनार्दन देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

        गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. दयानंद महाजन, गजानन रेवडेकर व बाळ पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

      सोहळ्याचे सूत्रसंचालन- भास्कर साळुंके व प्रस्तावना- राजेंद्र चव्हाण यांनी केले. आभार रवींद्र रेवडेकर यांनी मानले.  स्वामींच्या मठात विद्यार्थी-पालक व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत येरम, सागर मेस्त्री, सुर्यकांत नाचरे, जयसिंग परब, संतोष  रेवडेकर, जगदीश सावंत, आनंद पेवेकर  यांनी फारच मेहनत घेतली होती.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week