
यशस्वी उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी !
मी उद्योजक होणारच कर्तव्य फाउंडेशन मुंबई, शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई आणि देवामृत फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने ''मी उद्योजक होणारच ! आणि ग्लोबल महाराष्ट्र एन्टरप्युनर कॉन्क्लेव्ह - २०२०''या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योगात असलेल्या, नसलेल्या यशस्वी उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी मी उद्योजक होणारच हा भविष्याचा वेध घेणारा कार्यक्रम ! या कार्यक्रमात अनेक प्रतिथयश उद्योजक, उद्योजकीय संस्था, सनदी अधिकारी, आर्थिक आस्थापने, विविध बँकांचे संचालक, गुंतवणूकदार यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत असताना कर्मवीर व निष्काम कर्मयोगी, तसेच देशातील समस्त भटके विमुक्त जमाती यांसाठी एकमेव आशास्थान, स्फूर्तिस्थान व प्रेरणास्थान असलेल्या आणि संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी समर्पित करणारे, त्यांचे प्रश्न मार्गी लावणारे मा.श्री.दादासाहेब इदाते यांचा सन्मान केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते ''जीवनगौरव पुरस्कार'' देऊन सन्मान करण्यात येणार आहे असुन त्यांचे मार्गदर्शनही या कार्यक्रमात लाभणार आहे.
विशेष अतिथी म्हणुन या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात आशिष चौहान, शंकर जाधव, सुरेश हावरे, अशोक खाडे यांसारखे अनेक दिग्गज मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ४ ते ८ या दरम्यान मुंबई येथील मुंबई (बॉम्बे) स्टॉक एक्सेंज BSE येथे केले आहे.
ज्या उद्योजकांना, होतकरू ध्येयवेड्या तरुणांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपले नाव, मोबाईल नंबर, आपल्या व्यवसायाचे नाव हि सर्व माहिती miudyjakhoarch@gmail.com या मेल वर पाठवावी. कार्यक्रम विनामुल्य असुन अधिक माहितीसाठी हेमंत मोरे, कृष्णा पाटील - 9870565122 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेने केले आहे.