जिजामाता उद्यान ते महालक्ष्मी मंदिर बससेवा सुरु !!

जिजामाता उद्यान ते महालक्ष्मी मंदिर बससेवा सुरु !!

      भायखळा पूर्व जिजामाता उद्यान येथून महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी जाण्याकरिता येथील नागरिकांना बससेवा उपलब्ध नव्हती त्यांना यासाठी भायखळा पश्चिम रेल्वे स्थानकाकडून बस साठी जावे लागत होते. याबाबत शिवसेनेचे उपविभागप्रमुख परेश कुवेसकर यांनी आमदार यामिनी जाधव यांच्या माध्यमातून बेस्ट प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून या ठिकाणी बससेवा उपलब्ध करून दिली. आज या जिजामाता उद्यानातून पहिली बस महालक्ष्मी मंदिरासाठी रवाना झाली या बससेवेचे उदघाटन आमदार यामिनी जाधव यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. त्यामुळे आता भायखळा पूर्व येथील नागरिकांना महालक्ष्मी मंदिर येथे जाण्यासाठी सरळ बस उपलब्ध होणार आहे. या प्रसंगी शिवसेना भायखळा विधानसभा संघटक विजय लिपारे, दिलीप वागस्कर, बबिता पवार, श्रद्धा वाघमारे आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर