शिवसेना भायखळा विधानसभा पदाधिकाऱ्यांना जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वाटप !!

शिवसेना भायखळा विधानसभा पदाधिकाऱ्यांना जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वाटप !!

        वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान ठेवून मा. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना भायखळा विधानसभेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपनेते आणि विभाग क्र. ११ चे विभागप्रमुख तसेच मुंबई मनपा स्थायी समिती मा. अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

      वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल, असा विश्वास नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

     नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे :-

विधानसभा समन्वयक : संतोष राणे

विधानसभा संघटक: विजय (दाऊ) लिपारे

विधानसभा सह समन्वयक : प्रशांत आडारकर, हेमंत मयेकर

विधानसभा सह संघटक : राजेश म्हात्रे (शाखा क्रमांक 207-208), विधानसभा सहसंघटक फईम शेख (शाखा क्रमांक 211- 212)

उपविभागप्रमुख : परेश कुवेसकर (शाखा 208-211), भारत पाटील (209-210), देवेंद्र कदम (207-212)

विधानसभा उपसमन्वयक : दिलीप वागस्कर, निसार काझी, संकेत सांगळे, राजेश जुमलेदार

शाखाप्रमुख : नागेश धाटावकर (शाखा 207), विजय शिंदे (208), सुधीर कीर (209), राकेश खानविलकर (210), आमिर अन्सारी (211)

शाखा समन्वयक : गौरव कासले (208), गणेश पाटील (210), रोहित रहाटे (211), उस्मान गायकवाड (212).

महिला पदाधिकारी :

विधानसभा समन्वयक :कांता मयेकर

विधानसभा संयुक्त समन्वयक :श्रद्धा हुले

महिला विधानसभा सहसमन्वयक : पुष्पलता वस्त

विधानसभा संघटक : ममता पालव

सहसंघटक : प्राची कदम (शाखा 207/ 208), शेजल गमरे (शाखा 209/210), बबिता पवार (211/212)

महिला उपविभागसंघटक : संगिता मारणे ( 207/208), डॉ. तेजल भाकरे (209/210), मुस्कान शेख (211-212),

महिला शाखा संघटक : स्मिता अडसुळे (शाखा 207), श्रद्धा पवार (208) अश्विनी खटावकर (209), मेघा भोईर (210), रुमाना शहा (211), महिला शाखा समन्वयक :जया गांगुर्डे (209), वैशाली मुरुडकर (210), संपदा काजरोळकर (212) तसेच अरुणा यादव महिला विधानसभा उपसमन्वयक यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

         एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ वाढत आहे. लवकरच युवासेना आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी नियुक्त करण्यात येतील. सर्वांनी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करुन सामान्य माणसाला न्याय द्यावा. कुणाच्याही टीकेकडे लक्ष न देता आगामी निवडणुकांत संघटनेचा झेंडा एकदिलाने फडकवूया. बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊया. कामाला लागा, भक्कम पाठबळ द्यायला मी समर्थ आहे, असे मार्गदर्शन यावेळी यशवंत जाधव यांनी केले. या कार्यक्रमात आमदार यामिनी जाधव यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.



Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर