
डॉ. प्राजक्ता मोंडकर यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती !!
डॉ. प्राजक्ता मोंडकर यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती !!
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा डॉ. प्राजक्ता गणेश मोंडकर यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी डॉ. प्राजक्ता मोंडकर यांची या पदावर नियुक्ती केली. डॉ. प्राजक्ता यांनी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या कामामुळे त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी बढती देऊन नियुक्ती करण्यात आली. डॉ. प्राजक्ता मोंडकर यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पक्षनेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देऊन पक्षवाढीसाठी कार्यरत राहण्याचा मनोदय डॉ. प्राजक्ता गणेश मोंडकर यांनी व्यक्त केला.