
आर्थर रोड येथे बाप्पाच्या विसर्जनाला मोफत कांदे-पोहे-पाणी वाटप !!
आर्थर रोड येथे बाप्पाच्या विसर्जनाला मोफत कांदे-पोहे-पाणी वाटप !!
मुंबई चिंचपोकळी पश्चिम येथील गुलाबराव गणाचार्य चौकात अनंत चतुर्दशी दिवशी मुंबई-उपनगरातून हजारो गणेशभक्त कुटुंबासह, बाप्पाला निरोप देण्यास सकळ पासूनच उपस्थित असतात. चिंचपोकळी पुलावरून सर्व मोठे गणपती गिरगाव चौपाटी येथे विसर्जनाला जातात. त्यामुळे एकाच जागेवर उभे राहून सर्व गणपतींचे दर्शन होते.
बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या भक्ताचे आभाळ होऊ नये या म्हणून आर्थर रोड येथील सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर गुप्ता यांच्या संकल्पनेने हवाबाई चाळ कमिटी राहिवाश्याच्या वतीने वीस हजार पेक्षा जास्तच प्लेट कांदा-पोहे व पाणीचे वाटप करण्यात आले.
मंडळाचे हे १० वे वर्ष असून प्रत्येक वर्षी सामाजिक बांधिलकीने पोहे व पाणी वाटपाचे कार्य करीत आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या वीस हजार पेक्षा जास्त भाविकांनी कांदा पोहे व पाणीचा लाभ घेतला. शिवशंकर गुप्ता यांच्या मार्गदर्शना खाली, रमेश गुप्ता, सुरेश गुप्ता, कार्तिक गुप्ता सह हवाबाई चाळीतील सर्व राहिवाश्यानी फारच मेहनत घेतली होती.