आर्थररोडच्या राजाचे उत्साहात आगमन !!

आर्थररोडच्या राजाचे उत्साहात आगमन !!

    पारशीवाडी मित्र मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण !!

       जगभरातील १०१ गणेश मूर्तींचे दर्शन घडविणारे महाराष्ट्रातील एकमेव मंडळ, अशी ख्याती असलेले आर्थररोड येथील पारशीवाडी मित्र मंडळ, आर्थर रोड चा राजा" चे आगमन मोठ्या जल्लोषात  नुकतेच आगमन झाले.

        मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे ५० वे वर्ष असून मंडळ हिरक महोत्सवाकडे वाटचाल करणार आहे. मागील तीस दशके मंडळाने गणेशोत्सवच्या माध्यमातून समाज प्रबोधन देखावे सादर करून मंडळाने शेकडो पारितोषिके मिळविली आहेत. 

       यावर्षी मंडळ गणेश कावीठिया यांचे संकल्पनेतून राजस्थानी महालाची प्रतिकृती, गणेश भक्तांसाठी साकारणार असून, गणेश मूर्ती सिद्धेश दिघोळे यांची आहे. तसेच उत्सव कालावधीत रोज अभिषेक, गणेश याग, ५० महिलांची पंचारती, महिलांची मंगळागौर सह विविघ नृत्ये, इत्यादीचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाचे अध्यक्ष- रवींद्र रेवडेकर, चिटणीस- अजित  चाळके, कार्याध्यक्ष- संकेत येरम व कोषाध्यक्ष- दीपक सागवेकर आहेत. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सुवर्ण महोत्सवी वर्षं यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

    गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांनी मंडळास भेट देऊन आर्थर रोड च्या राजाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष- रवींद्र रेवडेकर यांनी केले आहे.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित