गोरेगाव पूर्व मुंबई येथे भव्य प्रभात फेरी संपन्न !

गोरेगाव पूर्व मुंबई येथे भव्य प्रभात फेरी संपन्न !

        बृहन्मुंबई महानगर पालिका, विभाग पी/उत्तर यांच्या मार्गदर्शनाखाली, लक्ष्यप्राप्ती फेडरेशन, लक्ष्यद्विप फेडरेशन, पी/उत्तर महिला बचत गट मार्गदर्शक, नोंदणीकृत महिला बचत गट यांच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त, गोरेगाव पूर्व येथे भव्य प्रभात फेरीचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

          गोरेगाव पूर्व येथील, शिवशाही सोसायटी, कृष्णा सोसायटी, ओंकार सोसायटी, नागरी निवारा प्लॉट  ५/१, ६ व ८ व संकल्प ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी प्रभात फे-या  काढण्यात आल्या. समारोप वैभव शॉपिंग सेंटर येथे करण्यात आले.

      प्रभातफेरीत लक्षदीप फेडरेशन अध्यक्षा- सीमा घोरपडे, लक्षप्राप्ती फेडरेशन अध्यक्षा-अक्षता कदम, संकल्प ज्येष्ठ नागरिक संघाचे - सूर्यकांत सोडये, दिलीप धारकर, विद्याधर विचारे सह ज्येष्ठ पुरुष/महिला साहभागी झाल्या होत्या. संकल्पच्या ज्येष्ठ महिलांनी देशभक्तीपर गीते गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली. विभागातील नोंदणी कृत बचत गट, सामाजिक मंडळे नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले  हाते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week