
जावा-येझदी चाहते २० वा आंतरराष्ट्रीय जावा-येझदी दिन साजरा करण्यासाठी आले एकत्र !!
जावा-येझदी चाहते २० वा आंतरराष्ट्रीय जावा-येझदी दिन साजरा करण्यासाठी आले एकत्र !!
देशभरात जावा आणि येझदी मोटरसायकलबद्दलची आपली परस्पर आवड आणि प्रेम साजरे करण्यासाठी ५,००० हून अधिक उत्साही ब्रँड प्रेमी आले एकत्र !
आंतरराष्ट्रीय जावा-येझदी दिनासाठी एकत्र आलेल्या रायडर्सची आजवरची सर्वात मोठी संख्या !!
पुणे, १२ जुलै २०२२: देशभरातील जावा-येझदी समुदाय २० वा आंतरराष्ट्रीय जावा-येझदी दिन साजरा करण्यासाठी रविवारी १० जुलै २०२२ रोजी त्यांच्या जावा आणि येझदी मोटरसायकलवरून रस्त्यावर उतरला. हा देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात उत्साही मोटरसायकल चालवणाऱ्या समुदायापैकी एक आहे. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय जावा-येझदी दिवसाच्या राइडमध्ये विक्रमी सहभाग नोंदवला गेला. आजपर्यंतचा सर्वात मोठा जावा-येझदी दिन साजरा करताना भारतभरात ५,००० हून अधिक रायडर्स विविध कार्यक्रम आणि क्लब/डीलरशिप-आयोजित राइड्ससाठी उपस्थित होते. या टर्न आऊट मध्ये क्लासिक जावा आणि येझदी मालकांसह नवीन जावा आणि येझदी रायडर्सचा समावेश होता.
या वर्षीचा मुख्य कार्यक्रम बंगळुरू शहरात आयोजित करण्यात आला होता. भारतातील सर्वात मोठ्या जावा येझदी समुदायांपैकी एक बंगळुरू मध्ये आहे. त्यामध्ये क्लासिक मॉडेल्सचा मोठा संग्रह आहे. यावर्षी शहरातील प्रसिद्ध सेंट जोसेफ शाळेच्या मैदानावर १००० मोटारसायकली आणि १२०० लोक उपस्थित होते. समविचारी ब्रँड निष्ठावंतांच्या मेळाव्याव्यतिरिक्त ऑन-साइट 'अॅडव्हेंचर ट्रेल', आयकॉनिक जावा आणि येझदी मॉडेल्सचे प्रदर्शन आणि लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स यासारख्या आकर्षक उपक्रमांनी सहभागींचे मनोरंजन केले. सहभागींसाठी 'टग ऑफ वॉर', सर्वोत्कृष्ट पुनर्संचयित मोटरसायकल, सर्वोत्तम देखभाल केलेली मोटरसायकल आणि जावा आणि येझदी मॉडेल्सवर सर्वाधिक अंतर प्रवास यासारख्या स्पर्धाही होत्या.
कम्युनिटीचे आभार मानताना क्लासिक लिजेंड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सिंग जोशी म्हणाले, आंतरराष्ट्रीय जावा येझदी दिवस हा आपल्या जावा येझदीप्रेमी समुदायासाठी कॅलेंडरमधील सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि या वर्षी त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र आणणे हा आमच्यासाठी आनंददायी अनुभव आहे. ब्रँड्स आणि मोटारसायकलींबद्दलचे त्यांचे प्रेम आणि उत्कटता भारावून टाकणारी आहे. आम्हाला हा बंध आणखी मजबूत करण्यासाठी आणि समुदायाला अधिक मोठे करण्यासाठी भरीव योगदान देण्याकरता तितकीच प्रोत्साहन देणारीही आहे.
दरवर्षी, जावा-येझदी दिवस नवीन रायडर्ससह दरवर्षी सामील होत असलेल्या कम्युनिटी राइडिंगच्या संकल्पनेला चालना देत आहे. उत्साह आणि उर्जेने उत्तेजित, क्लासिक आणि विंटेज मालक आणि नवीन मोटरसायकलस्वार देशभरातील जावा-येझदी दालनांमध्ये उत्सवाच्या राइडसाठी एकत्र आले. जावा- येझदी मोटरसायकलचे संपूर्ण देशभरातील मोटारसायकल चालवणाऱ्या समुदायामध्ये शोध, बंधुता आणि सौहार्द याच्या भावनेला चालना देणारे तत्त्वज्ञान या सर्व घटनांना बांधून ठेवणारे सामाईक पाऊल होते.