
स्निग्धा गोविलकर ला वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन सीमेवरील सैनिकांची सेवा करायचीय...
स्निग्धा गोविलकर ला वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन सीमेवरील सैनिकांची सेवा करायचीय...
मुंबई: नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेत मुंबईस्थित गडहिंग्लज तालुक्यातील नरेवाडी गावची सुकन्या कु स्निग्धा सदाशिव गोविलकर हिने ९१.२० टक्के गुण संपादन करून, द कॉन्व्हेंट गल्स हायस्कूल, प्रभादेवी, दादर ह्या शाळेतून प्रथम १० मध्ये येण्याचा मान पटकाविला. तिचे वडील मर्चंट नेव्हीत कॅप्टन असून आई गृहिणी आहे. कु. स्निग्धा हिला वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन सीमेवरील सैनिकांची सेवा करायची आहे. अभ्यासा व्यतिरिक्त तिला वाचन, नृत्य, संगीत, चित्रकला, नाट्यभिनयाची आवड आहे. विद्याताई पटवर्धन यांच्याकडे स्निग्धाने दोन वर्षे अभिनयाचे धडे घेतले. स्निग्धाने भरत नाट्यमचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. चित्रकलेची शासनाच्या परीक्षा देखील दिली आहे. ९ वी व १०वी या वर्षात तीने सर्व कलागुणांना बाजूला सारून, अहोरात्र अभ्यास करून ९१.२० टक्के गुण मिळविले.
शाळेतील शिक्षक, आई-वडील व मावशी प्रमिला सावंत यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. डिलाईल रोड येथील यशस्वी हाऊसिंग सोसायटी, नरेवाडी ग्रामस्थ मंडळ, कोल्हापूर व स्थानिक सामाजिक संस्थांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.