
गिरणगावात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न !
मुंबई : डिलाईल रोड येथील ना. म. जोशी मार्गा वरील, हुकमिल लेन येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने, इतिहास अभ्यासक - राजेंद्र सावंत व रमा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रथमच श्री शिवजन्मोत्सव सोहळा, थाटात संपन्न झाला.
शिवजयंती उत्सवाच्या निमिताने, बालगोपाळा साठी सूर्य नमस्कार शक्ती उपासनेची स्पर्धा, शिवचरित्रावर चित्रकला स्पर्धा, वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्यांना शिवसेना शाखा प्रमुख- विवेक खाडये व राजेंद्र सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र, भेटवस्तू व अन्य सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
महिलांनी बाल शिवबाचा पाळणा बोलून जन्मोत्सव साजरा केला. श्री राजेंद्र सावंत यांनी उपस्थितांना शिवचरित्रावर थोडक्यात मार्गदर्शन केले. हिंदुत्वनिष्ठ शिवप्रेमी भक्तांनी शिवरायांच्या प्रतिमेची पालखी काढली.
या सोहळ्यास विश्वनाथ बने, ज्योती घाग, आनंदराव पाटील, शैलेश रेडेकर, शुभांगी कुराडे, शोभा ढमाले, अवधूत केसरे, बळवंत जाधव यांनी फारच मेहनत घेतली होती.
त्यानंतर शिवचरित्रावर वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा झाल्या. श्री राजेंद्रदादा सावंत यांनी शिवचरित्रावर थोडक्यात माहिती दिली.
नंतर स्पर्धेतील विजेत्यांसाठी शिवसेना शाखाप्रमुख श्री गोपाळराव खाड्ये यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा समारंभ पार पडला.
श्री विश्वनाथ बने, श्रीमती ज्योती ताई घाग, श्री आनंदराव पाटील, श्री शैलेशराव रेडेकर, सौ रमा ताई सावंत, सौ शुभांगी ताई कुराडे, शोभाताई ढमाले, श्री अवधूतदादा केसरे अशा सर्व धर्मनीष्ठ रहिवाशांच्या उत्साही सहभागातून कार्यक्रम आनंदाने निर्विघ्नपणे पार पडला.