कोल्हापुर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान (मुंबई) ने ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेटून व्यक्त केली कृतज्ञता !

कोल्हापुर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान (मुंबई) ने ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेटून व्यक्त केली कृतज्ञता !

 रविवार दि.२२ डिसेंबर २०१९ रोजी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई च्या वतीने विभागात कृतज्ञता व स्नेहमेळावा पार पडला. उपरोक्त प्रतिष्ठानने ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर सहीत पश्चिम महाराष्ट्रावर ओढवलेल्या पूरस्थितीत केलेल्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत ना.म.जोशी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंडित थोरात व सहकाऱ्यांनी शैक्षणिक साहित्य देऊ केले होते.

     काही नियोजित व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना कृतज्ञता सोहळ्यासाठी उपस्थीत राहता आले नसल्या कारणाने आज प्रत्यक्ष पोलीस ठाणे मध्ये जाऊन वरिष्ठ पो.नि. श्री. पंडित थोरात व सहकारी श्री. सदानंद राणे यांना कृतज्ञता सन्मानचिन्ह, प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची विशेष पुरवणी, दिनदर्शिका व कोल्हापूरच्या प्रेमाचा स्नेहाचा प्रतीक असलेला गुळ भेट देताना शिवशाहू प्रतिष्ठान चे सल्लागार व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त श्री. जीवन भोसले, दै.सकाळ चे मुंबई वितरण व्यवस्थापक श्री. दिनकर कोकितकर, सरस्वती को.ऑप.सोसायटी चे चेयरमन श्री. शिवाजी चव्हाण, प्रतिष्ठान सचिव कृष्णा पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

    प्रतिष्ठानकडून होत असलेल्या सामाजिक कार्याची, उपक्रमांची स्तुती करत पुढील सामाजिक वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देत सर्वांचे गोडकौतुक वरिष्ठ पो.नि. पंडित थोरात व सहकाऱ्यांनी केले.


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week