
अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेच्या वतीने स्टॉल विक्रेत्यांना मोठ्या छत्रीचे वाटप !!
अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेच्या वतीने स्टॉल विक्रेत्यांना मोठ्या छत्रीचे वाटप !!
अंधेरी विलेपार्ले येथिल वृत्तपत्र विक्रेते जे दिवसभर रस्त्यावर बसुन आपला वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात, त्या सर्वांना अंधेरी वृत्तपत्र सेनेचे अध्यक्ष श्री मधुसुदन सदडेकर, सरचिटणीस श्री रविंद्र चिले यांच्या वतीने संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई साहेबांच्या हस्ते स्टॉलवर लावण्यात येणाऱ्या छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष श्री प्रकाश विठोबा पोवार, नाना निरावडेकर, हरिष भेदा, राजन यादव व अंधेरीतील वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेते श्री गणेश गुप्ता यांच्या मुलाने बारावी परीक्षेत 93% मार्क घेतल्यामुळे त्याला रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
याबद्दल सर्वांनी अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेचे वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.