EPS95 पेंशनधारक करणार देशव्यापी उपवास आंदोलन !

EPS95 पेंशनधारक करणार देशव्यापी उपवास आंदोलन !

          देशांतील विविध महामंडळे, खाजगी उद्योग, सहकार क्षेत्र इत्यादी मध्ये काम केलेल्या सुमारें 67 लाख EPS 95 पेंशनधारक हे गेल्या अनेक वर्षापासून न्यायाचे अपेक्षेत आहेत. या पेंशन धारकांना  फक्त 300 रु ते 3000 रु पर्यंत पेंशन मिळतें त्यावर कुठलाही महागाई भत्ता नाही की वैद्यकीय सुविधा नाही.

       कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वात या पेन्शनधारकांनी आज पर्यंत  राष्ट्रीय संघर्ष समितीचे बॅनरखाली सर्व प्रकारची आंदोलने केलीत, निवेदने दिलीत, संबंधितांच्या भेटी घेतल्यात. आणि सरते शेवटी देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांची देखील  दिनांक 04 मार्च,2020 ला दिल्ली येथे मथुरा खासदार श्रीमती हेमा मालिनी यांचे समवेत भेट घेतली व त्यांना फक्त निवेदनच दिले नाही तर 27 मिनिटे सविस्तर चर्चा देखील केली. व त्यात मा. पंतप्रधान यांनी या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन पण दिले.  त्यामुळें या पेंशन धारकांना आशा निर्माण झाली होती की आता आपला प्रश्न निकाली निघेल.  मा. केंद्रिय श्रम मंत्री यांचे सुचने वरून संघटनेने सर्व आंदोलने स्थगित केलीत  मात्र  संघटनेचे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्रातील बुलडाणा येथे साखळी उपोषण सुरु ठेवलेले आहे. व गेल्या 880 दिवसापासून हे आंदोलन बुलडाणा येथे सुरू आहे. या आंदोलनाची माहिती दररोज सोशल मीडियावर संबधीताकडे पाठविली जाते व जेंव्हा लॉकडाऊन नसेल तेंव्हा प्रत्यक्ष रित्या मा जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदन सुद्धा दिले जाते  माञ आजपर्यंत देखील या आंदोलनाची दखल सरकार कडून घेतल्या गेली नाही व पर्यायाने कोरोना च्या या कठीण काळात अनेक पेंशनधारक सन्मानजनक पेंशन ची वाट पहात हे जग सोडून गेलेत.

       कोरोना साथीचा रोग गेल्या वर्षीपासून आला होता परंतु या पेन्शनधारकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ईपीएस पेन्शनची महामारी सुरू झाली आहे ज्यात  जवळपास 5000  ईपीएस पेंशन धारक   जगातून निघून जात आहेत आणि आता कोरोना महामारीमुळे मृत्यूचे प्रमाण आणखी वाढले आहे.

  त्यामूळे अजून एक प्रयत्न म्हणून दिनांक 1 जून 2021 रोजी ईपीएस 95 पेन्शनधारकांनी एक दिवसीय राष्ट्रव्यापी उपोषण कार्यक्रम हाती घेतला आहे. या दिवशी देशांतील 67 लाख पेंशन धारक आप आपल्या घरी आपल्या कुटुंबीया सोबत सकाळी 08 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपवास करतील. व त्यानंतर या उपवास आंदोलनाचा आपला फोटो त्यांचे त्यांचे लोकसभा मतदार संघातील खासदार तसेच मा. पंतप्रधान यांना email वरून, व्हॉट्सॲप वरून, ट्विटर वरुन पाठवतील व आपल्या भावना व्यक्त करुन न्याय् मिळवून देण्यासाठी विनंती करतील. या आंदोलनात सध्या कार्यरत असलेल्या कामगारांनी सुद्धा त्यांचें उज्वल भवितव्यासाठी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेने केलें आहे.

        जे वृध्द आजारी पेंशन धारक असतील त्यांनी उपवास न करता प्रार्थना करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. 

     या आंदोलनाची नोटीस राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी मा. पंतप्रधान, श्रम मंत्री, वित्तमंत्री यांना पाठविली आहे.

     तरी सर्व EPS पेंशन धारक व कार्यरत कर्मचारी यांनी हे उपोषण आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन संघटनेनचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष रामेश्वर शेडगे व प्रकाश मिरगे यांनी केले आहे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week