
धनुष्यबाण आणि शिवसेना !!
शिवसेनेचा फुटीर शिंदे गट आणि भाजपने संख्येच्या बळावर सत्ता स्थापन केली असली तरी, शिंदे गट खरी शिवसेना आमचीच आहे म्हणून न्यायालयात याचिका सादर केली आहे. या याचिका विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही याचिका सादर केल्या आहेत. या सत्ता संघर्ष संबंधी सर्वोचं न्यायालयात याचिका प्रलंबित असून, न्यायालयाच्या प्रलंबित निर्णयामुळे खऱ्या शिवसेनेचा निर्णय लागत नसला तरी. शिंदे गट "धनुष्यबाण" या निवडणूक चिन्हावर दावा करीत आहेत. चिन्ह गोठवावे अशी मागणी करीत आहेत. म्हणजे त्यांना भीती वाटू लागली आहे की, धनुष्यबाण खऱ्या शिवसेनेची ओळख आहे. त्यामुळे आमदारांची संख्याबळ आणि भाजप बरोबर सत्ता मिळाली असली तरी, निवडणुकीत मतदारांसमोर मत मागायला जायचे आहे. त्यामुळे आपली डाळ शिजणार नाही. पूर्ण पराभव होऊ शकेल, म्हणून चिन्ह गोठवण्याची याचिका सादर केली आहे. शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे, वाघ आणि धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ओळख आहे. त्यामुळे शिंदे गट धनुष्यबाण विरुद्ध निवडणूक लढवण्यास भीत आहेत.