नरवीर तानाजी मालुसरेंच्या १३ व्या वंशजाचा सत्कार !

नरवीर तानाजी मालुसरेंच्या १३ व्या वंशजाचा सत्कार !

   हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दि. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्य गाथा हा चित्रपट गीता सिनेेमागृह येथे शिवसेना, युवासेना शाखा १९८ विनामूल्य आयोजित करण्यात आला असता, नरवीर तानाजींचे १३ वे वंशज पोलादपूर अस्मिताचे संपादक आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष, व गड किल्ले संबंधी इतिहास लिहिणारे श्री. रवींद्र मालुसरे यांचा या कार्यक्रमात, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिनभाऊ अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी माजी महापौर स्नेहल आंबेकर, शाखाप्रमुख दीपक बागवे, युवासेना अधिकारी नितीन शिरोडकर, निरंजन नलावडे, अनुपमा परब, नंदू गावडे मा. उपविभागप्रमुख, दिनेश बोभाटेे, प्रतिभा दळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week