लसीकरण केंद्र आता वरळी विधानसभा क्षेत्रात !

लसीकरण केंद्र आता वरळी विधानसभा क्षेत्रात !

      स्थानिक शिवसेना आमदार वरळी विधानसभा आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापौर सौ किशोरी किशोर पेडणेकर यांच्या पाठपुराव्याने मुंबई महापालिका जी-दक्षिण विभाग यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १९९ मधील अपोलो मिल येथे असलेल्या सार्वजनिक वाहनतळ या ठिकाणी "लसीकरण केंद्राचे उद्घघाटन दुरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत आज पार पडले. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, सचिन अहिर, सुनील शिंदे, राम साळगावकर, सुनील अहिर, गोपाळ खाडये व शिवसैनिक, अधिकारीवृंद उपस्थित होते.


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week