देश चालविण्यासाठी समाजातील सर्वांना सोबत घ्यावे लागते, हे फक्त काँग्रेसच करू शकतो- आमदार, भाई जगताप !!

देश चालविण्यासाठी समाजातील सर्वांना सोबत घ्यावे लागते, हे फक्त काँग्रेसच करू शकतो- आमदार, भाई जगताप !!

         देश चालवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालावे लागते. कारण  हा देश समाजातील सर्व घटकांचा आहे. सर्वांचा विचार करावा लागतो. जे आजपर्यंत काँग्रेस नेहमी करत राहिली आहे आणि यापुढेही करत राहील. जो समाजातील दुर्बल घटक आहे, त्याला शक्ती द्यायचे काम काँग्रेसने मागील ७० वर्षांत केले आहे, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईत केले. आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली, मुंबई काँग्रेसचे सचिव व मातंग समाजाचे नेते विकास तांबे यांच्या वतीने, कोरोना काळामध्ये मातंग समाजाच्या ज्या लोकांनी जनतेसाठी काम केले, त्या सर्वाना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमादरम्यान भाई जगताप बोलत होते.

         कार्यक्रमाला भाई जगताप यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवजी सिंह, AICC सचिव आशिष दुआ, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर व वसीम जावेद खान, मुंबई काँग्रेसचे सचिव वसीम जावेद खान,  मुंबई काँग्रेसचे सचिव, मातंग समाजाचे नेते  व कार्यक्रमाचे आयोजक विकास तांबे, मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक निवास चव्हाण व त्यांच्या चमूने आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. 

      या समारंभात अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर