आंतरराज्यीय विवाह फसवणूक रॅकेट उघड !!
आंतरराज्यीय विवाह फसवणूक रॅकेट उघड !
गुन्हे प्रकटीकरण कक्ष-1 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची ची मोठी कामगिरी....
वृत्तपत्र जाहीराती व मॅट्रिमोनियल साईटचा गैरवापर करून दिव्यांग, घटस्फोटीत व असहाय्य महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून खोटे लग्न करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे.
आरोपी अनेक खोट्या नावांचा वापर करून महिलांची फसवणूक करत होता.
पीडित कुटुंबाकडून तब्बल 97 लाखांची फसवणूक केली होती. देशभरातील 25 पेक्षा अधिक महिलांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
फसवणुकीच्या पैशातून घेतलेली BMW (X1) कार जप्त करण्यात आली आहे. बनावट आधार कार्ड, मोबाईल एटीएम कार्ड जप्त केले आहे.
आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या मुलाला ही सह-आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.
(प्रीती तिवारी)