मृत देहाची ओळख पटवून खुनाच्या गंभीर आरोपींना केली तात्काळ अटक !!
मृत देहाची ओळख पटवून खुनाच्या गंभीर आरोपींना केली तात्काळ अटक !!
मृत देहाची ओळख पटवून खुनाच्या गंभीर आरोपींना केली तात्काळ अटक !!
भाईंदर पूर्व येथील सचिन तेंडुलकर मैदानाच्या समोरील कांदळवनातील झाडाझुडपात एक अनोळखी पुरुष याचा मृतदेह वय वर्ष अंदाजे ३० ते ४० वर्ष हा कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्यावरून सदरबाबत नवघर पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
अकस्मात मृत्यू मधील अनोळखी मयत याचा मृतदेह कुजल्याने व काही प्रमाणात जळल्याने मृताची ओळख पटविणे अत्यंत किचकट व गुंतागुंतीचे झाले होते. अनोळखी इसमांच्या वारसांचा शोध घेत असताना दिनांक १/६/२०२६ रोजी इसम नामे गौरव विजय प्रकाश बडसर वय वर्ष २५, पत्ता रूम क्रमांक ३ लक्ष्मी चाळ, पूजा नगर केबिन क्रॉस रोड, भाईंदर पूर्व. हा बेपत्ता झाल्याची खबर नवघर पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती.
अकस्मात मृत्यूच्या घटनास्थळावर मिळून आलेल्या वस्तू व बेपत्ता इसम गौरव प्रकाश बडसर वय वर्षे २५ याच्या वस्तू एकमेकांशी मिळत्या जुळत्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तसेच मयत इसम गौरव प्रकाश बडसर याचा खून झाल्याचे अकस्मात मृत्यूच्या चौकशीत निष्पन्न झाल्याने सदर अकस्मात मृत्यूची चौकशी सहायक पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे यांनी अनोळखी इसमाच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सदरची माहिती वरिष्ठांना देऊन माननीय वरिष्ठ यांचे मार्गदर्शनाखाली खुनाचा तपास सुरू करण्यात आला होता.
घटनास्थळी भेट देऊन मयत नामे गौरव विजय प्रकाश बडसर याच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण द्वारे तसेच सीसीटीव्ही फुटेजद्वारे गुन्हा करणाऱ्या आरोपी १) विमल प्रेम कुमार राजभर (भारद्वाज) वय १९ वर्ष, सध्या राहणार रूम नंबर १०३, कविता अपार्टमेंट, गणेश गल्ली नगर रोड, भाईंदर पूर्व. २) विशाल प्रेम कुमार भारद्वाज राजभर वय वर्ष २५ सध्या राहणार रूम नंबर १०३ कविता अपार्टमेंट, गणेश गल्ली नगर रोड, भाईंदर पूर्व, तालुका जिल्हा ठाणे व विधी संघर्ष ग्रस्त बालक वय १६ वर्ष यांनी मिळून जुन्या भांडणाचा राग मनात धरून मयत यास दारू पाजुन सचिन तेंडुलकर मैदानाचे समोरील कांदळवनातील झाडाझुडपात निर्जन स्थळी नेऊन मयत यास चाकूने भोसकून व दगडाने ठेचून मयत गौरव विजय प्रकाश बडसर याचा अत्यंत निर्घृण पणे खून करून त्याचा मृतदेह नष्ट करण्याचे उद्देशाने जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोमे हे करत आहेत. सदरची कामगिरी माननीय श्री निकेत कौशिक पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालय, माननीय श्री दत्तात्रय शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त, माननीय श्री राहुल चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ १, माननीय श्री सोहेल शेख सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद यादव पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
(प्रीती तिवारी)