२६१ ग्रॅम कोकीन जप्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष १ मिरा रोड वसई विरार पोलीस आयुक्तालयाची कारवाई !!

२६१ ग्रॅम कोकीन जप्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष १ मिरा रोड वसई विरार पोलीस आयुक्तालयाची कारवाई !!

     नयानगर परिसरात विदेशी नागरिकाकडून तब्बल 78,45,000/- रुपये किंमतीचे 261.5 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात यश !!


      अंमली पदार्थ विरोधी कक्ष-1 , मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय पथकाने ईशा वाईन शॉप समोर, नयानगर, मिरारोड (पूर्व) येथे गस्तीदरम्यान ही यशस्वी कारवाई केली.


     सदरचा आरोपी हा नायजेरियन विदेशी नागरिक असून पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपीकडून वरील प्रमाणे कोकेन विक्रीसाठी बाळगलेले मिळून आल्याने तो अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.


     आरोपी विरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मि.भा.व.वि. पोलीसांची अंमली पदार्थांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचे समजते.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week