मुंबईतील साकी विहार परिसरात लक्स स्पा मध्ये अवैध वेश्याव्यवसाय ?

मुंबईतील साकी विहार परिसरात लक्स स्पा मध्ये अवैध वेश्याव्यवसाय ?

मुंबईतील साकी विहार परिसरात लक्स स्पा मध्ये अवैध वेश्याव्यवसाय ?

    मुंबईत व्यवसायाचे तसे तर अनेक मार्ग आहेत, परंतु एक व्यवसाय मुंबईत सध्या खूप भरभराटीला आला आहे. तो म्हणजे स्पा अँड सॅलूनचा. बहुतेक दुकानांच्या बाहेर स्पा अँड सॅलूनचा बोर्ड लावून त्याच्या आत असा व्यवसाय चालवला जातो वेश्या व्यवसाय....

       ज्याला देशातील सभ्य समाज आजही मान्यता देत नाही. असाच एक स्पा अँड सॅलून लक्स स्पा या नावाने 14, नवजीवन कमर्शियल प्रिमायसेस लि., समोर. अन्सा इंडस्ट्रियल इस्टेट, साकी विहार रोड, साकीनाका, अंधेरी (पू), मुंबई -४०००७२ साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालवला जात आहे. त्या स्पा चालकांच्या दबंगगिरीचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो प्राप्त माहिती नुसार ही मंडळी उघडपणे सांगताना ऐकू येते की त्यांनी साकीनाका पोलीस स्टेशनला मॅनेज केले आहे व त्यांना मुंबई पोलिसांच्या एका मोठ्या अधिकाऱ्याचे संरक्षण मिळाले आहे. यामुळेच काही प्रामाणिक पोलीस अधिकारी कारवाई करण्यास कचरतात.


       आता हे पहावं लागेल की साकीनाका पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर या स्पाची चौकशी करून त्यावर पीटा अंतर्गत कारवाई करतील का ? व तिथे कार्यरत असलेल्या परिस्थितीने गांगरलेल्या महिलांची सुटका केली जाईल का ?


      स्पा पार्लरवर पीटा कायदा (PITA - Immoral Traffic Prevention Act, 1956) अंतर्गत होणारी कारवाई मुख्यतः स्पा किंवा मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक मानवी वाहतूक किंवा देहविक्रीच्या (Sex Racket) रॅकेटविरोधात केली जाते.

    कारवाईची मुख्य माहिती आणि प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:

    कायदेशीर तरतूद: स्पा पार्लर स्वतः कायदेशीर आहेत, परंतु जर तिथे मालकाने किंवा व्यवस्थापकाने अनैतिक व्यवसाय चालवला, तर पीटा कायद्यानुसार गुन्हा नोंदवला जातो.

छापेमारीची पद्धत: पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यास ते सहसा 'डिकॉय' (Bogus/बोगस) ग्राहक बनवून पाठवतात। खात्री पटल्यावरच पोलीस पथक तिथे छापा टाकते.

     सुटका आणि पुनर्वसन: या कारवाईत देहविक्रीच्या विळख्यात अडकलेल्या किंवा बळजबरीने ठेवलेल्या महिलांची सुटका केली जाते आणि त्यांना बालगृह किंवा महिला निवारा गृहात पाठवले जाते.

     अटकेची कारवाई: स्पा चालवणारे, दलाल (Agents) आणि ग्राहकांना पीटा कायद्यांतर्गत अटक केली जाते.

३. पीटा (PITA) कायद्याची मुख्य कलमे (Important Sections)

स्पा पार्लरमध्ये अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याचे आढळल्यास Immoral Traffic (Prevention) Act, 1956 अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हे दाखल होतात.

कलम ३ (Section 3): स्पाच्या जागेचा वापर 'वेश्यागृह' (Brothel) म्हणून केल्याबद्दल मालक किंवा व्यवस्थापकाला १ ते ३ वर्षांपर्यंतची कैद आणि दंडाची तरतूद आहे.

कलम ४ (Section 4): दुसऱ्या व्यक्तीच्या देहविक्रीच्या कमाईवर (कमाईमधून कमिशन घेणे किंवा घर चालवणे) जगणाऱ्या व्यक्तीला २ वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते.

कलम ५ (Section 5): एखाद्या व्यक्तीला बळजबरीने किंवा आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यवसायात आणणे (Procuring/Inducing), यासाठी ३ ते ७ वर्षांपर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा आहे.

कलम ७ (Section 7): सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शाळांच्या २०० मीटरच्या परिसरात अनैतिक व्यवसाय चालवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

   सदर स्पा बद्दल अधिक माहिती द्यायची असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा (बातमीकार - डिजिटल वृत्तपत्र) संपादक - अभिषेक शिंदे मोबाईल - 9987676699


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे