लोअरपरळ पुलावर पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था अपुरी !!
मुंबई : अजून पावसाळ्याची सुरुवातही झालेली नाही, तरी लोअर परळ पुलावरील पूर्व-पश्चिम मार्गिकांवर पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था अपुरी असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या पुलावर एक्सलेटरची व्यवस्था, सुरक्षा रक्षकांची नेमणूक यावर खर्च केला जातो, पण पावसाळी पाण्याचा निचरा करणारी मूलभूत व्यवस्था सक्षम नाही. याकडे दुर्लक्ष का केले जात आहे ? मागील तीन वर्षांपासून हीच अवस्था कायम आहे.
करोडो रुपये खर्च करूनही पुलाखालील व वरील मार्गिका यांवर नागरिकांना सुविधा का मिळतं नाहीत ?
पावसाळ्यापूर्वी निचरा व्यवस्थेची दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची?
वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना का होत नाहीत?
दुसऱ्या गावातील नदी नाल्यांची पाहणी करण्यावर भर दिला जातो. पण आपल्या गावातील नागरिक रोजच्या रोज त्रास सहन करत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हा दुहेरी मापदंड आता असह्य होतं आहे.
जाब फक्त प्रतिनिधींनाच नाही… तर बॅनर फोटोमध्ये गुंतलेल्या कार्यकर्त्यांनी देखील आत्मचिंतन करावं. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर आवाज उठवण्यात आपण मागे का पडतोय ? नागरिकांच्या पैशातून उभारलेली सुविधा जर नागरिकांना उपयोगी पडत नसेल, तर हा सामूहिक अपयशाचा पुरावा आहे.....
(श्री.रहेश रमेश भोवर)