सहा महिने बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा झाला होता खून !!
सहा महिने बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा झाला होता खून !!
सहा महिने बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा झाला होता खून !!
आचोळे पोलीस ठाणे (मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत) मोठी कामगिरी !!
सहा महिने बेपत्ता व्यक्तीचे गूढ अखेर उलगडले !!
नालासोपारा परिसरातून बेपत्ता झालेल्या रवि प्रेमसिंग बिडलान (वय ३४) यांचा खून झाल्याचे उघड झाले असून, या प्रकरणातील आरोपींना आचोळे पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.
१७ जानेवारी २०२६ पासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी सातत्याने तपास, तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने प्रयत्न सुरू ठेवले.
अखेर ४ जून २०२६ रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता खून केल्याची कबुली मिळाली.
आरोपींनी मृतदेह बिल्डिंगच्या गटार चेंबरमध्ये लपवून ठेवल्याचे उघड झाले असून तो बाहेर काढण्यात आला.
सदर प्रकरणात आत्ता पर्यंत 04 आरोपी अटक करण्यात आले असून गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.