मराठी अभिनेत्री संचिता उगाळे यांचे निधन !!
मराठी अभिनेत्री संचिता उगाळे यांचे निधन !!
मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. छावा, कुमकुम, भाग्य आणि दिलवाली दुल्हा ले जायेगी यांसारख्या चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री संचिता उगाळे हिचे निधन झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१४ जून) नालासोपारा पूर्व येथील आचोळे गावातील साई संतोषी इमारतीमधील तिच्या राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळून आली. ही घटना सायंकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
आचोळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद बाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतल्यानंतर काही वेळाने ती छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने वसई-विरार महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले.
संचिता उगाळे ही सोशल मीडियावरही सक्रिय होती आणि अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील होती. तिच्या अचानक जाण्याने मनोरंजन क्षेत्रात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.