आणि देव आरशासमोर सापडला ! लघुपट 'देवा तुला शोधू कुठे'

आणि देव आरशासमोर सापडला ! लघुपट 'देवा तुला शोधू कुठे'

       "देवां तुला शोधू कुठे...? "  हा १२८ पुरस्कार मिळालेला हा लघुपट प्रेक्षकांना आता मोफत पाहता येणार आहे.

          पारंबी प्रॉडक्शन निर्मित आणि अक्षय वास्कर दिग्दर्शित देवां तुला शोधू कुठे...?  या लघुपटाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या लघुपटाला आतापर्यंत अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतात १२८ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.


      अक्षय वास्कर या तरुण निर्माता दिग्दर्शकाने " देवां तुला शोधू कुठे " या लघुपटाची निर्मिती केली आहे. उद्धट असलेला मुलगा अचानक देवाला भेटण्यासाठी स्वतःमध्ये कसा बदल करतो. हा ध्येयवेडा मुलगा आपल्य़ा प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आपले ध्येय कसे साध्य करतो? त्याला देव कसा भेटतो ? हे या लघुपटात मांडले आहे.


हा लघुपट सध्या MX play, Shemaroo Me, Hangama play, Airtel Xstream, Vi Movies आणि TV JioCinema 

      या प्रसिद्ध अशा OTT माध्यमांतुन प्रेक्षकांना मोफत पहायला मिळणार आहे अशी माहिती दिग्दर्शक अक्षय वास्कर यांनी दिली आहे. या लघुपटामध्ये मुख्य भूमिकेत निरंजन कुरुमकर असून पुनम चांदोरकर, फैजल सय्यद आदी कलाकार आहेत. 

       प्रकाशन सोहळया प्रसंगी प्रमुख अतिथि प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील (वछ्छी) - मालिका - रात्रीस खेळ चाले, अभिनेता सुरेश डाळे, दिग्दर्शक महेश तेटांबे, रसिका थिएटर चे सर्वेसर्वा आबा पेडणेकर, दिग्दर्शक गणेश तळेकर, निर्माती चंद्रकला प्रकाश वास्कर,  लेखक सनीत मालुसरे,  छायाचित्रकार अनमोल चव्हाण, संकलक कुणाल बने, संगीतकार मंदार पाटील, रंगभूषाकार मनिषा पाटील, सहाय्यक -दिग्दर्शक योगेश बोरकर व प्रथमेश बेचावडे, गीतकार यज्ञेश दौड, कला दिग्दर्शक निखिल चौधरी, प्रॉडक्शन मॅनेजर संदीप रंधवे, कार्यकारी निर्माता सागर सुरलकर तसेच सिने क्षेत्रांतील आदी मान्यवर उपस्थित होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week