
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने जागतिक महिला दिनी नारी शक्तीचा सन्मान !
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने जागतिक महिला दिनी नारी शक्तीचा सन्मान !
कोरोना संकटकाळात मा. महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांनी एका योध्याप्रमाणे जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडले. मुंबई महानगर पालिकेची सर्व रुग्णालये तसेच प्रत्येक कोविड सेंटर यावर त्यांचे जातीने लक्ष होते. मुंबईच्या प्रचंड लोकसंख्येमुळे उभे ठाकलेले हे आरोग्य विषयक आव्हान आपण समर्थपणे पेलले. मुंबईचे प्रथम नागरिक ह्या जबाबदारीने दिवस रात्र अविरत मेहनत घेऊन मुंबईतील नागरिकांना ह्या आपत्तीपासून आपल्यामुळे जीवनदान मिळाले.
याच काळात डाॅ.सारिका पाटील यांनी एका योद्ध्याप्रमाणे आपल्या जीवाजी तमा न बाळगता दिवस- रात्र अविरत मेहनत घेऊन नायर रुग्णालयातील १२ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केले. ७५० हूनही जास्त कोरोना बाधित महिलांचे यशस्वी बाळंणपण आपल्याच देखरेखीखाली झाले. एक विक्रम म्हणून नोंद घेण्याजोगी ही कामगिरी आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महापौर किशोरीताई पेडणेकर व डॉ. सारिका पाटील यांचा सन्मान कोविड रणरागिनी म्हणून बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी दिपक शिंदे, दिनकर कोकीतकर, संजय चौकेकर, बाळा पवार, शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये, जीवन भोसले, भालचंद्र पाटे, प्रशांत ब्रीद, श्रीकांत शिगवण, प्रदीप सातार्डेकर, मंगेश भोजे, प्रशांत जानवलकर व विजय पवार उपस्थितीत होते.