
राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जंयती निमित्त सकल मराठा समाज डिलाईलरोड तसेच मुंबईस्थित कोल्हापुर वासियांच्यावतीने गडकिल्ले संवर्धन कार्यासाठी आर्थिक सहाय्य !
राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जंयती निमित्त सकल मराठा समाज डिलाईलरोड तसेच मुंबईस्थित कोल्हापुर वासियांच्यावतीने गडकिल्ले संवर्धन कार्यासाठी आर्थिक सहाय्य !
सालाबादाप्रमाणे सकल मराठा समाज, शिवभक्त व मुंबईस्थित कोल्हापूरवासिय समाजाच्या वतीने डिलाईल रोड मध्ये आज मंगळवार दिनांक १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आऊसाहेब जन्मोत्सव सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काळजी घेवुन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
सकल मराठा समाजाच्या नियम व रितीनुसार विभागातील सुहासिनींच्या हस्ते राजमाता आऊसाहेबाचे प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच या मातेने आपल्याला संस्कार शिकवले त्या मातेचा सन्मान म्हणून १३ जानेवारी आपण संस्कारदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर विभाग यांनी हाती घेतलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ले दुर्गसवंर्धन मोहीम कार्यास आर्थिक हातभार म्हणून आर्थिक मदत करण्यात आली.
कार्यक्रमाला शिवभक्त, कोल्हापुर वासिय व सकल मराठा समाज सेवक उपस्थित होते.