शिवशाहू प्रतिष्ठानचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मुंबईत संपन्न !

शिवशाहू प्रतिष्ठानचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मुंबईत संपन्न !

        दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबईचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा ना.म.जोशी उत्सव मंडळाच्या कार्यालयात मा.आमदार सुनिल शिंदे व शिवसेना शाखा १९८ चे शाखाप्रमुख दिपक बागवे यांच्या शुभ हस्ते पार पडला.

      दरवर्षी अगदी भव्य दिव्य होणारा शिवशाहू प्रतिष्ठानचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अगदी साधेपणाने घेण्यात आला.

    कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून केली. यावेळी देशाच्या सीमेवर भारतभूमीचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या कोल्हापूरच्या जवानांसह समस्त महाराष्ट्र देशातील शहीद जवानांना त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू पावलेले जेष्ठ शिवसैनिक राजू रिंगे, सुरेंद्र पवार, कोंडविलकर तसेच माजी खासदार मोहन रावले साहेब यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कोरोना काळात शिवसेनेने कोल्हापूर ग्रामस्थ वासियांना केलेल्या मदतीच्या आधाराच्या हातांचे शिवशाहू प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानले. तसेच शिवशाहू प्रतिष्ठान तर्फे कोरोना काळात घेतलेल्या सामाजिक उपक्रमांचे त्याचबरोबर राज्यात जाणवलेला रक्ताचा तुटवडा व त्यातच महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरातून केलेल्या १५३ रक्त बॅग संकलनाचे कौतुक मा. आमदार सुनिल शिंदे व शाखाप्रमुख दिपक बागवे यांनी केले.

     कोरोना सारख्या कठीण काळातही सामाजिक बांधिलकी जपत कोणताही खंड पडू न देता दिनदर्शिका प्रकाशन सोहळा असो वा सामाजिक उपक्रम असो विविध समाजपयोगी कार्यक्रम पार पाडण्यात आले. या उपक्रमास दै.सकाळ समूहाचे मुंबई वितरण व्यवस्थापक दिनकरजी कोकितकर, दै.पुढारी समुहाचे विकासजी आचरेकर, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले, राजू येरुडकर, विनायक आसबे, संतोष वर्टेकर, संजय कुंभार व आदिनाथ धडाम उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे व ना.म.जोशी उत्सव मंडळाचे आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रविंद्र देसाई यांनी मानले व सहसचिव शैलेश मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week