वृत्तपत्र विक्रेत्यांचा देवमाणूस - मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते सन्मान !
वृत्तपत्र विक्रेत्यांचा देवमाणूस - मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते सन्मान !
कोरोना रुपी संकटाचा सामना करताना सारा देश महाराष्ट्र भयभीत होता. माणूस माणुसकी विसरून गेला होता रक्ताची माणसं, आपली माणसं परकी झाली होती अशा परस्थीतीत मध्ये ईश्वराचा अंश असणारी माणसं या सर्व परस्थीती मध्ये आपली सर्वांची काळजी घेत होती.
या कठीण काळात वृत्तपत्र व्यवसायाला देखील मोठी किंमत मोजावी लागली सर्वत्र बंदसदृश परस्थिती असल्याने मुंबईतील असंख्य वृत्तपत्र विक्रेत्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालत जीवनावश्यक वस्तूंची मदत करणारे, हाॅस्पिटल किंवा वैद्यकीय मदत, इतर सहकार्य तसेच पोलिस, महानगरपालिका यांच्या रस्त्यावरील कारवाईत मदतीसाठी नेहमीच धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणजे दैनिक सामना चे महाव्यवस्थापक श्री दिपकजी शिंदे.
अश्या कनवाळू व्यक्तिमत्वाचा सन्मान मुंबई ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने मुंबईच्या प्रथम नागरीक महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाखाप्रमुख गोपाळ खाडे, विजय रावराणे, हरी पवार, संजय चौकेकर, मधूसुदन सतडेकर, बाळा पवार, अजित पाटील,वजीवन भोसले, हेमंत मोरे ,भालचंद्र पाटे, प्रशांत ब्रीद, जयवंत डफळे, राजु धावरे, प्रकाश कानडे, घनशाम यादव, प्रकाश गिलबिले व मुंबई ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेता संघाचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थिती होते.