
डाॅक्टर, नर्स व कर्मचारी या कोविड योद्धांना दिवाळी अंकाची भेट !
डाॅक्टर, नर्स व कर्मचारी या कोविड योद्धांना दिवाळी अंकाची भेट !
मुंबई महानगरपालिकेचे बा.य.ल. नायर धर्मादाय रुग्णालय शंभराव्या वर्षात पदार्पण करत असुन कोविड १९ संकटकाळात डाॅक्टर, नर्स व कर्मचारी यांनी आपला जीव धोक्यात घालुन दहा हजार पेक्षा जास्त कोविड १९ रुग्णांना बरे केले व पंचविस हजार पेक्षा जास्त कोविड १९ चाचण्या केल्या आहेत. आजही हे अविरत कार्य सुरु आहे.
त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने डाॅ.सारिका पाटील, नोडल अधिकारी कोविड १९, डाॅ. शैलेश मोहिते (एम.एस.), रुचा साळगावकर (मॅट्रोन), नर्स व कर्मचारी या कोरोना योद्धांना अनेक दिवाळी अंकांची भेट देण्यात आली व कोल्हापुर विशेष दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले, पत्रकार सुरेश शिंत्रे, प्रशांत जानवलकर व शैलेश मगदुम उपस्थितीत होते.