
वृत्तपत्राचे महत्व समाजात वृद्धींगत करणारा संदेश दर्शवणारे टी-शर्ट चे अनावरण.
वृत्तपत्राचे महत्व समाजात वृद्धींगत करणारा संदेश दर्शवणारे टी-शर्ट चे अनावरण.
भारताचे मिसाइल मॅन माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वृत्तपत्र विक्रेत्यांनी सालाबाद प्रमाणे वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला. वृत्तपत्राचे महत्व समाजात वृद्धींगत करणारा संदेश दर्शवणारे टी-शर्ट चे अनावरण यावेळी करण्यात आले.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे मार्गदर्शक डॉ.पवन अग्रवाल, पत्रकार श्री. संजय भोईर, विश्वस्त संजय चौकेकर, बाळा पवार, हेमंत मोरे, जीवन भोसले, भालचंद्र पाटे, अजित सहस्रबुद्धे, सुशांत वेगुर्लेकर, रवी अमृतकर, प्रकाश कानडे, प्रकाश गिलबिले, युनुस पटेल, बबलु सातार्डेकर, संतोष विचारे व समीर कोरे या समारंभास उपस्थितीत होते.
प्रास्ताविक भालचंद्र पाटे ह्यांनी केले. डॉ. पवन अगरवाल यांनी "शिक्षक ते राष्ट्रपती" असा प्रवास करणाऱ्या राधाकृष्णन यांचे नाव शिक्षक वर्गात मोठ्या अभिमानाने घेतले जाते. त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेता ते राष्ट्रपती असा प्रवास करणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना कायम प्रेरणा देत राहील असे सांगितले. आजच्या कार्यक्रमात टी शर्टची संकल्पना मांडणारे संघटनेचे विश्वस्त जीवन भोसले यांचे श्री. संजय चौकेकर ह्यांनी कौतुक केले. शेवटी संघटनेचे सचिव बाळा पवार व हेमंत मोरे ह्यांनी सर्वांचे आभार मानले.
विक्रीसाठी टि-शर्ट उपलब्ध असुन जीवन भोसले व भालचंद्र पाटे 9892037543 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले आहे.