वृत्तपत्र विक्रेत्यांना महापौर किशोरी पेडणेकरांनी मदत करावी !

वृत्तपत्र विक्रेत्यांना महापौर किशोरी पेडणेकरांनी मदत करावी !

     वृत्तपत्र विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वे प्रवासाची परवानगी मिळण्याबाबत मुंबई महापौर यांना निवेदन पत्र दिले आहे.

   कोरोना महामारीमुळे रेल्वे सेवा सामान्य माणसांसाठी बंद केली आहे. पण वृत्तपत्र व्यवसायाला सरकारने अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी दिली आहे.

     मुंबईत जागेचे भाव गगनाला भिडलेले आहेत. जे विक्रते विरार, नालासोपारा, ठाणे व मुंबई उपनगरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाला परवानगी असुनही मुंबईत पहाटे येण्यासाठी रेल्वे सुविधा नसल्यामुळे अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांच्या परिवाराला उपासमारीची वेळ आली आहे.

    लाखो मुंबईकरांना वृत्तपत्र हवे असुनही वृत्तपत्र विक्रेत्याला आपली सेवा देता येणे दुरापास्त झाले आहे.

    तरी आपण मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून मुंबईतील वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुंख्यमंत्री आदरणीय श्री. उध्दवजी ठाकरे व मा. रेल्वे मंत्री श्री. पियुषजी गोयल यांच्याशी चर्चा करुन अत्यावश्यक सेवा म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांना रेल्वे प्रवासाची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावा.

    असे निवेदन पत्र मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांना वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने आज महापौर निवास्थानी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त श्री. जीवन भोसले व वृत्तपत्र विक्रेते श्री. शंकर रिंगे, श्री. राजेंद्र चव्हाण, श्री. अमोल खामकर यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आले.


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week