कोरोना परीस्थितीचा फायदा घेत असल्याने माणूसकी राहिली नाही...

कोरोना परीस्थितीचा फायदा घेत असल्याने माणूसकी राहिली नाही...

     संपुर्ण जग, देश, महाराष्ट्र व आपल्या सर्वांवर चाल करुन आलेल्या या कोरोनारुपी महामारीविरुद्ध सरकार व कोराना योद्धा एकदिलाने लढत असतांना दिसत आहेत. लाॅकडाउनमुळे अनेक ठिकाणी सामान्य माणूस अडकुन पडला आहे. या माणसांना दानशूर व्यक्ती आपआपल्यापरीने मदत करत असतांना दिसत आहेत. त्या समाजसेवकांना आमचा सलाम. लाॅकडाउनमुळे नोकरी धंदा बंद असल्याने अनेकांचे खाण्यापिण्याचे खुप हाल होत असुन आर्थिक संकटाचा सामना ही करावा लागत आहे. अश्या परस्थितीत सरकारने एका चांगला निर्णय घेतला असुन ज्यांचे आरोग्य चांगले आहे त्यांनी प्रमाणपत्र दिल्यास त्यांना त्यांच्या गावी जाता येईल. पण अश्या परस्थितीत काहीजण स्वतःचा फायदा करुन घेत असल्याचे दिसत आहे. डॉक्टरकडुन प्रमाणपत्र हवे २०० ते ५०० रुपये, झेरॉक्स प्रति पेपर पाच रुपये, ट्रॅव्हल्सचे भाडे विचारले तर तीन पट, दुधाच्या पिशीवर दोन-तीन रुपये वाढ घेणे, भाज्यांचे भावतर सांगायला नको. अनेक वस्तुंचे भाव दुप्पट तिप्पट करुन ठेवले आहेत. अशा परीस्थितीत आपण एकमेकांना सांभाळून घेणे गरजेचे असताना, अशा परस्थितीत स्वत:चा फायदा काही लोक करत असल्याने मनाला खुप दुःख होते.  माणूसकी शिल्लक राहिली आहे का.....असा प्रश्न पडतो.

         पण मग लक्ष जाते वृत्तपत्र विक्रेत्याकडे......माणुसकीचा प्रवाह जपणारा जिवंत झरा ! एकही पैसा जास्त न घेता छापील किमतीत वृत्तपत्र विकणारा !! कमी नफा मिळाला तरी सचोटीने आपला व्यवसाय करणारा वृत्तपत्र विक्रेता!!!

     आज विश्वासार्हता ह्या शब्दाचा अर्थ नकळतपणे समजावून गेला हा विक्रेता...


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week