
ज्यांना खरी गरज आहे कृपया त्यांनीच फक्त गावी जावे !!
गावी जाण्यासाठी अनेक ग्रुप वर मॅसेज फाॅरवड होत असल्याने सर्वांना आनंद होत आहे. पण सर्वांना नम्र विनंती आहे ज्यांची शहरात गैरसोय होतेय ज्यांचे कुटुंब काळजी करत असेल त्यांनीच कृपया गावी जावे कारण त्यांना खरी गरज आहे. शहरात स्थानिक रहिवाशी आहेत त्यांनी विनाकारण गावी जाण्यासाठी गर्दी करुन नये तसेच आपल्या कुंटुबप्रमुखाला खर्चात पाडु नये.
हि वेळ ज्यांना गरज असेल त्यांनाच गावी पाठवायची आहे. शहरातील स्थानिक रहिवाशांना नम्र विनंती आपण आज आपल्या घरात सुरक्षित आहात. पुढिल दिवस अनेक कठीण प्रसंगाना तोंड देण्याची वेळ आपल्यावर येणार आहे. आपल्याला माहित असेलच काही लोक या परीस्थितीचा फायदा घेत असुन सामान्य माणसांची गैरसोय करुन पैसा कमवित आहेत. अशावेळी आज प्रत्येक सामान्य कुटुंबाने खर्चाला आवर घालणे व आपले कुटुंब सावरणे हे महत्वाचे आहे.