वाचकांसाठी वृत्तपत्र स्टाॅल सुरु करण्याचा संघटनेचा निर्णय !!

वाचकांसाठी वृत्तपत्र स्टाॅल सुरु करण्याचा संघटनेचा निर्णय !!

        मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानंतर घरोघरी वृत्तपत्र वितरीत न करण्याचा निर्णय सर्व संघटनांच्या वतीने घेण्यात आला आहे. परंतु मर्यादित स्वरूपात वितरण चालू व्हावे म्हणून वृत्तपत्र स्टाॅल सुरु करण्याचा निर्णय बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ घेत आहे. समाजात वर्तमानपत्र विश्वासार्ह म्हणुन ओळखले जाते. त्यामुळे सर्व वाचकांना वर्तमानपत्र सुरु आहे हे कळणे महत्वाचे असल्यामुळे वृत्तपत्र स्टाॅल सुरु होणे गरजेचे आहे. सरकारच्या आदेशानुसार आजपर्यंत घराबाहेर पडण्याचे आपण टाळले होते. लवकरच घरपोच सेवा देण्याबाबतचे सरकारचे धोरण आपल्यास अनुकूल होईल.

        कुठल्याही पेपर लाईनवाल्याच्या लाईनमध्ये स्टॉलवरील विक्रेत्यांनी घुसखोरी करू नये. अन्यथा फोरम व संघटना त्यांच्यावर कारवाई करेल. जेणेकरून आपल्या लाईन मधील विक्रेत्यांवर अन्याय होणार नाही. ही परिस्थिती जेमतेम थोड्या दिवसापुरती असेल. तरी वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या स्टाॅलवर सुरक्षित अंतर ठेऊन, आपली पुरेपुर काळजी घेउन आपला व्यवसाय करावा. जेणेकरुन आपले व समाजाचे आरोग्य सुरक्षित राहील.आतापर्यंत आपण सरकारने दिलेले आदेश पाळतच आलेलो आहोत. सरकारने सुचवल्याप्रमाणे आपण स्टॉल चालू करीत आहोत. 

         असे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ संजय चौकेकर, बाळा पवार, जीवन भोसले, हेमंत मोरे, भालचंद्र पाटे, प्रशांत ब्रीद, प्रकाश गिलबिले, बळवंत नलावडे, राजु सुर्वे, विश्वनाथ राणे, प्रवीण देवधर, प्रशांत कहु, सुनील दुबे, श्रीकांत शिगवण व शशि कुंभारगण, अजित पाटील (ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघ), संतोष विचारे (ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना), सि.एल.सिंग (वृत्तपत्र विक्रेता कल्याण संघ), अजित सहस्त्रबुद्धे (दादर वृत्तपत्र विक्रेता संघ), प्रकाश कानडे (दक्षिण मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ), दिपक सरमळकर (स्वराज्य वृत्तपत्र विक्रेता संघ) यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week