
वृत्तपत्र विक्रेत्यांना मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !
वृत्तपत्र विक्रेत्यांना मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !
संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना व्हायरस च्या संकटामुळे सर्वच उद्योगधंदे बंद असल्यामुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, यामध्ये अगदी हाताच्या बोटावर पोट असणारे वृत्तपत्र विक्रेता परिवार हि सुटला नाही अशा या गंभीर परिस्थीचा विचार करून मुंबईच्या महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्याकडून त्यांच्या विभागातील लोअर परेल व वरळी येथील वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महापौर बंगला येथे करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वांच्या परिवाराची काळजीपूर्वक विचारपूस करत यापुढेही येणाऱ्या अडचणीत नेहमीच सोबत राहण्याचे अश्वस्त केले.
याप्रसंगी दैनिक सामना चे महाव्यवस्थापक दीपक शिंदे, शाखाप्रमुख गोपाळ खाडे व बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त श्री. जीवन भोसले व शंकर रिंगे, राजेंद चव्हाण, बबलू सातार्डेकर, धनंजय वायाळ यासह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
मुंबईच्या प्रथम नागरीक या नात्याने अतिशय दुर्लक्षित पण कष्टाळू राबणाऱ्या हातांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल लोअर परळ व वरळी वृत्तपत्र विक्रेता संघ परिवाराच्या वतीने आम्ही सर्व वृत्तपत्र विक्रेते ताईंचे मनपूर्वक आभारी असल्याची भावना व्यक्त करत मुंबई ठाणे अशा विविध विभागात देखील या कष्टाळू राबणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता परिवाराच्या पाठीशी विभागातील स्थानिक नगरसेवक, समाजसेवकानी दातृत्वाचा हात दयावा असे आवाहन विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांनी केले आहे.