
गोवर्धन सोसायटीच्या तरुणांचा अनोखा उपक्रम...
लॉकडाऊन जाहीर करत सरकारने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र तरीदेखील जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला घेण्यासाठी मुंबईतील डिलाईड रोड, ना.म.जोशी मार्ग, गोवर्धन मधील सोसायटीतील रहिवाश्यांना घराबाहेर पडावे लागते. परिणामी त्या ठिकाणी गर्दी होते. आपले आरोग्य धोकादायक होऊ शकते म्हणुन गोवर्धन सोसायटीतील तरुणांनी रहिवाश्यांसाठी भाजीपाला सोसायटीत "भाजीपाला आपल्या दारी" या उपक्रमा मार्फत उपलब्ध करुन दिला. सामाजिक अंतर राखून ही भाजी खरेदी करावी याला गोवर्धन सोसायटील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला शेतातील ताजा माल दिल्याबद्दल नागरिकांनी ही तरुणांचे आभार मानले.