
माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या मार्फत वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक मदत !
माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या मार्फत वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक मदत !
आज संपूर्ण भारताला कोरोना नावाच्या विषाणूने ग्रासले आहे. त्यात वृत्तपत्र व्यवसायावर आर्थिक मंदीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला कोणी मदत करील या आशेकडे बघण्यापेक्षा लोअर परळ वृत्तपत्र विक्रेता संघ एक कुंटुब समजून याच आर्थिक मंदीची दखल घेऊन लोअर परळ वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने विभागातील विक्रेत्यांना २००० रुपयांची आर्थिक मदत माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.
वृत्तपत्र विक्रेत्यांना एक आर्थिक दिलासा देण्याचा छोटासा प्रयत्न लोअर परळ वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी बहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे जीवन भोसले, उपशाखाप्रमुख शंकर रिंगे, राजेंद्र चव्हाण व विभागातील वृत्तपत्र विक्रेते उपस्थितीत होते. ज्यांना शक्य होते त्यांना पैसे देण्यात आले उर्वरित वृत्तपत्र विक्रेत्यांना पैसे घरपोच लोअर परळ वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने देण्यात येतील.