लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या रक्तदान शिबीरास लोअर परळ विभागातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले रक्तदान !

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या रक्तदान शिबीरास लोअर परळ विभागातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले रक्तदान !

     ज्या ज्या वेळी देशावर भीषण आपत्ती आलेली आहे, त्या त्या वेळी मंडळाने मदतीचा हात पुढे केलेला आहे. आज देशावर आणि महाराष्ट्रावर ‘कोरोना’ च्या रुपाने आस्मानी संकट कोसळले आहे. म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. श्री. उध्दवजी ठाकरे व आरोग्यमंत्री मान. श्री. राजेशजी टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने दि. २३ मार्च २०२० ते १ एप्रिल २०२० पर्यंत सकाळी ९ ते सांय. ५ या वेळेत सुरक्षित व हायजेनिक ‘रक्तदान शिबीर’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

    ज्या व्यक्तिंना रक्तदान करावयाचे असेल त्यांनी ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ७७३८३६९४९५, ९७७३२९१५०२, ९७५७०१८४१९ आणि तारीख व वेळ आरक्षित करावा. एका वेळी फक्त पाच (५) व्यक्तिंना रक्तदान करता येइल.

    या रक्तदान शिबिरात रक्तदान करून या उदात्त कार्यास अनमोल सहकार्य करावे आणि आपण सारेच जण करोनाच्या या लढाईत रक्तदानाचे पवित्र कार्य करूया असे आवाहन मंडळाचे मानद्सचिव श्री. सुधीर साळवी यांनी केले आहे.


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week