
मुंबई बन रही है, वेश्या बाजार !!
देह विक्री हा जगातील सर्वात जुना व्यवसाय आहे. जगातल्या प्रत्येक संस्कृतीत याच्या पाऊल खुणा सापडतात. ह्याला अटकाव घालण्याचा प्रयत्न ही बऱ्याच देशांनीं केला पण यशस्वी झाला नाही. त्यामुळे इतिहास मात्र बदलला, करोना महामारीच्या काळात काही नियमांसह देशात नुकतीच परवानगी देण्यात आली होती. अशा रोगराईच्या काळात ब्रिटिशांनी सैनिकांच्या सुरक्षितेसाठी केलेला कायदा भारताची डेमोग्राफी बदलून टाकणारा होता.
मुंबई लगत मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तल्याच्या हद्दीत बऱ्याच प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालू होते, परंतू तेथिल कर्तव्य दक्ष पोलिस आयुक्त श्री सदानंद दाते यांच्या कर्तव्यामुळे आता बऱ्यापैकी हे छुपे वेश्या व्यवसाय कमी झाले आहेत.
परंतू मुंबई प्रदेशात अशा वेश्या व्यवसायावर बंदी आणण्यासाठी केलेली कारवाई दुर्मिळच ! मुंबई ग्रांटरोड मधील एक गल्ली सोडली तर दुसरीकडे कुठेच कायदेशीर वेश्या व्यवसायास परवानगी नाही. परंतु काही ठिकाणी अजूनही काही दलालां मार्फत वेश्याव्यवसाय सर्रास चालतो यात वेश्या गमनासाठी मुली पुरवून मिळणाऱ्या पैशात हे दलाल बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालवून आपला अर्थिक फायदा करून घेतात.
अशाच एक बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलालांची पोल उघडकीस आली. व्ही.पी.रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मजली बिल्डिंग (बिल्डिंग चे नाव आम्हाला देण्यात आले नाही) गजानन फ्लोर मिल, नवलकर लेन, व्ही पी रोड, मुंबई या ठिकाणी तळ मजला व दुसरा मजला येथे अवैध वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो अशी गोपनीय माहिती मा. सह आयुक्त मुंबई (गुन्हे) यांना प्राप्त झाली. एक इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या गमनासाठी मुली व स्त्रिया पुरवून तेथे वेश्या व्यवसाय चालवतो.
सदर बाबत पोलीस निरीक्षक प्रिया थोरात यांनी मा. पोलीस आयुक्त सुहास वारके, पोलीस सह आयुक्त गुन्हे बृहन्मुंबई यांच्या आदेशानुसार आणि श्री. संग्रामसिह निशाणदार पोलीस उपायुक्त प्रकटीकरण १ गुन्हे शाखा व चंद्रकांत जाधव सह पोलीस आयुक्त प्रकटीकरण पूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध छापा टाकण्याचं ठरल.
दिनांक १६ जून २२ रोजी घाटकोपर मुंबई युनिट ७ गुन्हे पोलीस पथकाने खाजगी बोगस गिऱ्हाईक बनून छापा टाकला असता, सदर ठिकाणाहून ८ गिऱ्हाईक ९ दलाल व ३३ वेश्या महिलांना ताब्यात घेऊन व्ही पी रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
सदर आरोपी हा बेकायदेशीर पणे महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत करीत असून ग्राहकांकडुन माहीलांना मिळणाऱ्या रकमेतून स्वतचा आर्थिक फायदा करून घेतो म्हणून आरोपीच्या विरोधात व्ही. पी. रोड पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार नियम कलम ३६३ व ३७० अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस सह आयुक्त गुन्हे सुहास वारके, पोलीस उपायुक्त संग्रामसिह निशाणदार गुन्हे प्रकटी करणं १ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक थोरात, पोलीस निरीक्षक जाधव, सह पोलीस निरीक्षक ओलेकर, पोलीस उप निरीक्षक धोत्रे, लोहकरे, पोलीस निरीक्षक काळे, परबलकर, महिला सह फौजदार, नाईक, सह फौजदार धुमाळ, पोलीस हवालदार पवार, शिंदे, भोई, जाधव, राऊत, शिंदे, खरे, पाटील, सावंत, महिला पोलीस शिपाई शेख, पो नाईक कदम, पो शिपाई राठोड, धुमाळ, मुसीमे यांनी केली.