बस्स मेम सहाब... मै इतना महिना ही आपके पास काम करुँगी !!

बस्स मेम सहाब... मै इतना महिना ही आपके पास काम करुँगी !!

        (वार्ताहर - प्रद्युमन देशपांडे) वो क्या है की, मै अपने शोहर के साथ कुवैत को काम के वास्ते जानेवाले है । 

हमारी एजंट साब से बात भी हो चुकी है । 

     श्रीमती ज्योती पांडे यांनी कामासाठी ठेवलेल्या कामवाल्या बाईने त्यांना सांगितले. महिन्याचा पगार हिशेब घेऊन श्रीमती पांडे मॕडम चे काम सोडून कामवाली निघून जाते .

      प्रारंभी ती कामवाली बाई एजंटला भेटून कामाची चौकशी करून घेते. एजंट सांगतो की, घरमालकाचे घरी दोन लहान मुले सांभाळणे, घराची साफ सफाई व जेवण बनवणे.

       यासाठी तुम्हा दांम्पत्यास प्रत्येकी  ४०,०००/- रु पगार मिळेल .

       मुंबई पेक्षा भरघोस पगार मिळतोय या आनंदात दोघे नवरा बायको हो म्हणतात आणि परदेशात जाण्याची कायदेशीर प्रक्रिया करून दि. ०५ एप्रिल २०२२ रोजी कुवैतला जातात .

               मोसाब अब्दुल्ला .

       कुवैत मधील घरमालक यांचेकडे काम सुरुवात होते..

      पण एजंटने सांगितल्या प्रमाणे काम नसून प्रत्यक्षात घरातील नऊ मुले सांभाळणे, सहा खोल्यांची व हाॕल ची साफ सफाई, तसेच सगळ्यांचे जेवण बनवणे हे काम चालू झाले...

       एवढी सगळी कामे करताना सकाळी ०६.०० वाजल्या पासून दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०० पर्यंत राब राब राबावे लागत असे. तब्बल बावीस तास काम करता करता कामवाली आजारी पडली. प्रचंड मानसिक ताण झाल्यामुळे पुरेसा आराम व पुरेशी झोप नसल्यामुळे तिला हाॕस्पिटल मध्ये अॕडमिट करावे लागले .

         बाई कमालीची थकली..हताष झाली.. खूपदा रडून झाले पण पश्चताप करण्या व्यतिरिक्त त्यांच्या हातात काहिही नव्हते .

      हाॕस्पिटल मध्येच संधी साधून तिने श्रीमती ज्योती पांडेशी संपर्क करून सगळी करूण कहाणी सांगितली.

       घरमालक मोसाब अब्दुल्ला आम्हाला सोडत नाही. आमचा मोबाईल काढून घेतो आम्हाला घरात बंद करून ठेवतो .

       हे ऐकून पांडे मॕडम चे मन कळवळून उठले.. काय करावे यांची मदत कशी करावी यांची सुटका होईल का ? 

       अश्या अनेक प्रश्नांनी पांडे मॕडम गोंधळून गेल्या आणि एके दिवशी त्यांनी भरोसा सेलने (गुन्हे शाखा) सेंट्रल आफ्रिका देशातून कौटूबिक हिंसाचार अंतर्गत एका पिडीत महिलेची सुटका केलेली बातमी वाचल्याचे लक्षात आले.

        दुसऱ्या दिवशी श्रीमती ज्योती पांडे सकाळची कामे आटोपून घराबाहेर पडल्या आणि भाईंदर पश्चिम येथे असलेल्या भरोसा सेलच्या कार्यालयात कुवैत प्रकरणाची तक्रार दिली.

       भरोसा सेलच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक तेजश्री शिंदे यांना सगळी घटना कथन केली.

         सदरील घटना तेजश्री शिंदे यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त श्री अमोल मांडवे यांना सांगितली व चौकशी करण्याची विनंती केली.

      श्री अमोल मांडवे यांनी इंडियन एँम्बसीला पत्रव्यवहार करून चौकशी केली असता घरकाम करण्याच्या करारानुसार ठरल्याप्रमाणे कामाची वेळ पूर्ण करावीच लागते.

       मात्र पिडीत व्यक्ती स्वतः होऊन  इंडियन एँम्बसी च्या कार्यालयात येऊन अश्या प्रकारच्या छळा बद्दल मदत मागितल्यास मदत नक्कीच मिळेल अशी माहिती मिळाली.

       दरम्यान मोठ्या मुश्कीलीने पिडीत महिला तेजश्री शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क करते आणि त्यांना इंडियन एँम्बसीच्या कार्यालयात जाण्याबाबत सुचना देतात .

        इकडे कुवैत मध्ये मोसाब अब्दुल्ला काही केल्या घराबाहेर जाऊ देत नव्हता . आणि असेच एके दिवशी किचन मधला भाजीपाला संपलाय आम्ही तेवढा आणून घेतो असे सांगून पिडीत दांम्पत्य घराबाहेर पडले व कुवैत मधील इंडियन एँम्बसीच्या कार्यालयात हजर झाले. तिथे त्यांना रितसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन दिवस त्यांच्या सेंटर मध्ये ठेवण्यात आले आणि पुढे दोन दिवसा नंतर त्यांना लेबर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात घरमालक मोसाब अब्दुल्ला यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला व कोर्टात हजर राहण्याचे समन्स ही बजावण्यात आले. मोसाब याने त्या पिडीत दांम्पत्याचे पासपोर्ट कोर्टात हजर केले .

       कोर्टाने त्यांना स्वखर्चाने दि.०४/०७/२०२२ रोजी भारतात परत जाण्यास सांगितले. ते जर जाणार नसतील तर ही केस पुढे चालू राहिल असा खुलासा ही कोर्टाने दिला .

        पिडीतांचे तिकीट काढण्यापासून तसेच इतर तांत्रिक बाबीची पुर्तता करून भरोसा सेलचे आधिकारी व अमलदार यांनी पुढील कार्यवाही करून दि. ०५/०७/२०२२ रोजी सदर दांम्पत्यास कुवैत मधून सुखरूप भारतात आणण्यात आले ! 

       आपल्या भारत देशातील महागाई वाढता बेरोजगार.. तुटपुंजा पगार अशा अनेक समस्याने ग्रासलेले लोक चार पैसे जास्त मिळवावेत यासाठी धडपडत असतात आणि अशातच आखाती राष्ट्रे भरघोस पगार देतात हे असे कुठून तरी ऐकून अशा घटनेस बळी पडतात. त्यांना बाहेरील राष्ट्रांच्या कायद्याची पुरेशी माहिती नसते.

        परिणामी असे अनेक कामगार तिकडेच अडकून पडतात...

         यासाठी बाहेरील राष्ट्रांचे कायदे सामाजिक नियम याची शहानिशा व सखोल अभ्यास महत्वाचा असतो. हे मात्र परदेशात कामाला जाणाऱ्या प्रत्येकांनी लक्षात घेतले पाहिजे अन्यथा अपूर्ण ज्ञानामुळे अशी फसगत नक्कीच झाल्यावाचून राहणार नाही! 

       वरिल कामगिरी श्री विजयकांत सागर पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अतिरिक्त कार्यालय पोलिस उपायुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल भाईंदर कक्षाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक तेजश्री शिंदे, पोलीस हवालदार सचिन तांबवे, सहाय्यक पोलीस हवालदार समृद्धी भगत, महाराष्ट्र पोलिस शिपाई आफ्रिन जुनैदी यांनी यशस्वीपणे पार पाडली.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week