काही आंबट शौकीन लोकांचे चोचले! मनाची खाज मिटविण्यासाठी लेडीज

काही आंबट शौकीन लोकांचे चोचले! मनाची खाज मिटविण्यासाठी लेडीज

       मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या स्पा वरती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची कारवाई !

    माणसाजवळ पैसा आला की माणसाचे अनेक प्रकारचे छंदही वाढतात. काही आंबट शौकीन पुरुष बॉडी मसाज करून घेण्यासाठी आवर्जून लेडीज स्पा सेंटर मध्ये जात असतात. आणि मग कधी कधी स्वेच्छेने, तर कधी जबरदस्तीने होणाऱ्या गैरप्रकारास त्यांना सामोरे जावे लागते. त्यात स्पा चे मालकही मुलींना अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त करतात. अशी काम करताना त्या मुली पैशाच्या आमिषाने गिऱ्हाईकांबरोबर हवे तसे अश्लील चाळे करीत असत अशीच एक घटना मिरारोड येथे घडली.

      दिनांक २४ डिसेंबर २१ रोजी अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस.एस.पाटील यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, ईलाईट बॉडी अँड ब्युटी स्पा (इलाईट स्पा दि सोल ऑफ माईंड) गाळा नंबर ०२, सॉलीटेअर बिल्डींग नं.०३, पूनम नगर, मिरभाईंदर रोड, मिरारोड पूर्व या स्पामध्ये येणाऱ्या  गिऱ्हाईकाकडून  मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिसच्या (अतिरिक्त सेवा) च्या नावाखाली कस्टमर कडून अधिक पैसा उकळण्यासाठी गिऱ्हाईकाशी अश्लील चाळे करीत असतात. व असले अश्लील चाळे करण्यासाठी स्पा चे चालक/ व्यवस्थापक मुलींना प्रोत्साहित करीत आहेत, अशी खात्रीशीर पोलिसांना माहिती मिळाली.

     मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पाटील यांनी बोगस गिऱ्हाईक आणि पंच यांना इलाईट बॉडी अँड ब्युटी स्पा ( इलाईट स्पा दि सोल ऑफ माईंड) गाळा नंबर २, सॉलीटेअर  बिल्डिंग नंबर ०३ पूनम नगर, मीरा भाईंदर रोड, मिरारोड पूर्व. या ठिकाणीं पाठवुन सत्य पडताळून पोलीस पथकासह दुपारी 3 च्या दरम्यान छापा टाकला. स्पा मध्ये एक महिला एका बोगस गिऱ्हाईकाशी नाहीते अश्लील चाळे करताना पकडली गेली.

      तसेच सदर स्पा ची महिला व्यवस्थापक हिच्याकडे पोलिसांनी पाठवलेल्या बोगस गिऱ्हाईकाने आपल्याला एक महिला पाहिजे, असे सांगितले सदर स्पा च्या व्यवस्थापक महिलेने पोलिसांनी पाठवलेल्या बोगस गिऱ्हाईकास असली कस्टमर समजून एक महिला, व ३ मुली दाखवल्या. मसाज व अतिरिक्त सेवा (एक्स्ट्रा सर्व्हीस) च्या नावाखाली चार हजार रुपये स्वीकारून एका महिलेस बोगस असलेल्या गिऱ्हाईकाबरोबर पाठवुन दिले. सदरच्या ह्या कृत्यास प्रोत्साहीत केल्याचे निदर्शनास आल्याने, महिला व्यवस्थापक व तीन महिला/मुली यांना व बोगस गिऱ्हाईकाकडून स्वीकारलेले चारहजार रुपये व कँश काऊंन्टर मधून जप्त केलेले एकूण आठ हजार रुपये ताब्यात घेतले आहेत. सदरच्या प्रकरणात पोलीस अंमलदार केशव शिंदे, नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी  दिलेल्या फिर्यादी वरून मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक/४६१प्रमाणे भारतीय दंड विधान कलम ४९४, ११४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          सदरची कामगिरी डॉ. महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे विभाग), श्री. अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग) मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. संपतराव पाटील, पोलीस हवालदार उमेश पाटील, पोलीस हवालदार विजय निलंगे, म.पोलीस शिपाई रामचंद्र पाटील, केशव शिंदे, महिला पोलीस शिपाई वैष्णवी यंबर, सुप्रिया तिवले, चा.पोलीस नामदार सम्राट गावडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी उत्कृष्ठ रित्या पार पाडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week