प्रिय सखे तुच !!
प्रिय सखे,
जर तु आज जवळ असतीस तर तुलाही रंगात चिंब भिजवले असते जसा तूझ्या प्रेमात मी भिजलोय. तुझ्या प्रीती चा रंग फक्त त्वचेवर नाहीं तर मनात हि उतरलाय अगदी खोलवर अगदी गडद. फक्त माझे अंग नाही तर माझे अख्खे आयुष्य रंगून गेले आहे तुझ्या संगतीत. ही होळी तर फक्त एक दिवसाची आहे ग तुझ्या रूपाने तर अख्खा सप्तरंगी इंद्रधनुष्यच अवतरला आहे माझ्या जीवनात. जगण्यातील खरे रंग तुझ्यामुळेच उमजू लागलेत.
तुला अलगद माझ्या मिठीत घेतल्यावर लाजेने चूर होताना तुझ्या गालावर उमटणाऱ्या त्या गुलाबी छटा, माझ्याकडे त्वेषाने झेपावणाऱ्या तुझ्या नाजुक ओठांचा तो लालचुटूक रंग, मला वेड लावणारी अणि सोन्यासारखी झळकणारी तुझी पिवळसर सुवर्ण कांती, अथांग पसरलेल्या निळ्याशार सागरासारखी गहिरी नजर, श्रावणात बहरणाऱ्या आल्हाददायक हिरव्यागार वनश्री सारखा मनाला मोहिनी घालणारा तुझ्या हस्यातील शीतल गोडवा, कपटीपणाचा किंचीत हि ओरखडा न उमटलेले एकदम धवल असे तुझे मन. तु स्वतःच एक इंद्रधनु असताना इतर कृत्रिम रंगात तुला रंगवणारा मी बापुडा कोण?
जिथे तुझा वावर असेल तेथे रंगांची उधळण नेहमीच होत असेल यात शंका च नाहीं. अगं, फक्त रंगांचे काय बसलीस, तु जेथे पाऊल ठेवशील तेथे पारिजात बरसत असेल. तुझ्या येण्याने फक्त रंगच नाहीं तर आसमंतात गंध ही दरवळत असेल. ❤️❤️❤️
--- तुझ्याच रंगात रंगलेला एक प्रेम वेडा ❤️❤️❤️
प्रेम आचार्य