संकल्प फाउंडेशन आणि पारंबी प्रॉडक्शन प्रस्तुत दुसरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव !!

संकल्प फाउंडेशन आणि पारंबी प्रॉडक्शन प्रस्तुत दुसरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव !!

          पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई, संकल्प फाउंडेशन आणि पारंबी प्रॉडक्शन प्रस्तुत दुसरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २५ जून २०२३ रोजी रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर, प्रभादेवी येथे पार पडला. महोत्सवाचे सह प्रायोजक सागर गायकवाड (स्वामी समर्थ इंटरप्रायझेस), सुरज जुईकर (पृथ्वी इंटरप्रायझेस) हे होते तसेच विद्यारत्न काकडे (उपसंचालिका) पु ल देशपांडे अकॅडमी आणि संतोष रोकडे (संकल्प फाऊंडेशन) हे मान्यवर ही त्यावेळी उपस्थित होते. महोत्सवाचे दुसरे वर्ष असून रसिक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती. पारंबी प्रॉडक्शन चे प्रमुख अक्षय वास्कर यांचे लघुचित्रपट महोत्सव आयोजित करण्याचे प्रयोजन मूलतः नाविन्यपूर्ण आणि समाजप्रबोधन करण्याऱ्या फिल्ममेकर्सना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या कल्पनेशक्तीचा विकास व्हावा तसेच चांगली संधी उपलब्ध व्हावी यासाठी होतं. याआधीही पारंबी प्रॉडक्शनने आयोजित केलेल्या फोटोजनिक फेस स्पर्धेत आणि एकपात्री अभिनय स्पर्धेतही तरुण तसेच ज्येष्ठ कलाकारांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला होता.

       या महोत्सवात देश परदेशातून तब्बल ११३ लघुपटांचा समावेश करण्यात आला होता. त्यात विशेषतः युनायटेड स्टेट्स, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम, ब्राझील, युनायटेड अरब एमिरेट्स, ऑस्ट्रेलिया, पोलंड, जर्मनी, क्रोएशिया, सिरियन अरब रिपब्लिक, स्वित्झर्लंड, मेक्सिको, अर्जेन्टिना, कोलंबिया, फ्रांस, इजिप्त, कझाकिस्तान अशा भारतासह परदेशातूनही बऱ्याच लघुपटांचा समावेश होता. यातील उत्कृष्ट लघुपटांच सादरीकरण महोत्सवात करण्यात आलं. 

       महोत्सवाला मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहून बक्षिस वितरण समारंभ रसिक प्रेक्षकांसाठी रवींद्र नाट्यगृह मिनी थिएटर मध्ये निःशुल्क भरवण्यात आला होता. या लघुपट महोत्सवाला सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर आणि दिग्दर्शक प्रशांत कडणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

       लघुचित्रपटांचे प्राथमिक फेरीचे परीक्षण लेखक, कवी, संकलक, दिग्दर्शक कल्पेश राणे यांनी केले तसेच अंतिम परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांनी केले.

      या लघुपट महोत्सवाचे आयोजन पारंबी प्रॉडक्शनचे प्रमुख अभिनेते, दिग्दर्शक अक्षय प्रकाश वास्कर तसेच सिनेमॅटोग्राफर सागर सुरळकर यांनी केले त्यात त्यांना समृद्धी काटे, स्मृती कांबळे, प्रथमेश केळगंद्रे, चेतन वागरे, नितीन पाटील, किरण जाधव, निलेश साळुंखे, अंकिता ढोकळे, सुप्रिया रांजणे अशी संपूर्ण टीम आयोजनात कार्यरत होती. 

        या महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचे प्रथम पारितोषिक शेखर रणखांबे दिग्दर्शित 'रेखा' या लघुपटाला मिळाले त्याचप्रमाणे दुसऱ्या पारितोषिकाचा मान आशुतोष जरे दिग्दर्शित 'डोब्या' आणि तिसऱ्या पारितोषिकाचा मान हर्षित दिग्दर्शित 'मांजा' या लघुपटाला मिळाला.

         विशेष ज्युरी पुरस्कार 'शिल्पकार' या लघुपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे (रेखा), सर्वोत्कृष्ट पटकथा (मांजा), सर्वोत्कृष्ट संवाद (डोब्या), सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार (रेखा) या लघुपटांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 


तसेच सर्वोत्कृष्ट संकलन म्हणून (मांजा),

सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी संगीत (डोब्या),

सर्वोत्कृष्ट अभिनेता (कोरड), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (रेखा), सर्वोत्कृष्ट बालकलाकार

(मांजा) या कलाकारांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

        सर्वोत्कृष्ट लॉकडाऊन चित्रपटाचा मान "आंबेडकर नगर लॉकडाऊन" या लघुपटाला मिळाला तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपट म्हणून "कष्ट" आणि पारंबी चॉईस पुरस्कार "इत्तर" या चित्रपटाला मिळाला. विशेष पुरस्कार म्हणून सर्वोत्कृष्ट पोस्टर पब्लिक चॉईस पुरस्कार 'विरान' या लघुपटाला मिळाला.

         ज्युरी विशेष उल्लेखनिय पुरस्कारात "उकिरड्याचं घरटं" लघुपटाला बेस्ट फिल्म , बेस्ट ऍक्टरेस, बेस्ट चाईल्ड ऍक्टर आणि बेस्ट म्युझिक हे पुरस्कार देण्यात आले . "लॉलीपॉप" लघुपटाला बेस्ट फिल्म ऑन सेक्स एज्युकेशन , "अवनी" फिल्म ला बेस्ट फिल्म ऑन LGBTQ , "इनर" लघुपटाला बेस्ट फिल्म फॉर कन्सेप्ट तसेच "टू वर्ल्ड" या लघुपटाला बेस्ट वूमन फिल्ममेकर, "बकरू" फिल्म ला बेस्ट ऍक्टर ,"अफू" फिल्म ला बेस्ट चाईल्ड ऍक्टर , "पारडन" फिल्म ला उत्कृष्ट कथा , "बत्ती" फिल्म ला बेस्ट फिल्म ऑन सोशल अवेअरनेस आणि "पण" या लघुपटाला यंग फिल्ममेकर्स या कॅटेगरी मधील पारितोषिक देण्यात आली.

       या लघुपट महोत्सवाचे निवेदन कोमल डांगे यांनी केले होते , साऊंड डिझाईन अनिकेत तुपट तसेच ग्राफिक डिझाईन नरेश माळी यांनी केले होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week