
पेंशनवाढीच्या फसव्या बातम्या !!
खासगी शेत्रातील ई पी एस १९९५ पेन्शनरांना ९ हजार रु वाढणार. लाखो पेंशनर्ससाठी खूष खबर. पेंशन मध्ये ९ पटीने वाढ. इ बातम्या काही वृत्त वाहिन्यांवर, वृत्तपत्रात, समाजमध्यामांवर प्रसारीत होत आहे. तत्पूर्वी सन २०१३ रोजी, बी जे पी चे खासदार प्रकाश जावडेकर यांनी संसदेत जाहीर केले की आमची सत्ता आल्यावर कोशियारी समितीची अंमलबजावणी करू. तरी अजूनही कोणतीही पेंशनवाढ होऊ शकली नसल्यामुळे, देशभरातील पेंशनवाढ संघटना मागील १० वर्षापासून दिल्ली पासून धरणे मोर्चे ई आंदोलने करीत आहेत. सर्वपक्षीय खासदार पेंशनवाढीची मागणी संसदेत करीत आहेत. मा पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन ही दिली आहेत. त्यांनी सकारात्मकता दाखिवली आहे. तरी आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्याचप्रमाणे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ई पी एस पेंशनरांना पेंशनवाढीच्या फसव्या बातम्या प्रसारीत करण्यात येत आहेत. यावर विश्वास ठेवणे योग्य नाही.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. त्याचप्रमाणे बी जे पी ला पुन्हा सत्ता मिळवायची असल्यास राष्ट्र उभारणीत ज्यांचा श्रेयाच्या वाटा आहे, अशा देशभरातील लाखो पेंशनरांना आणि त्यांच्या अवलंबून असलेल्या करोडो मतदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून चालणार नसून, निवडणुकातून जनतेने, मतदारांनी बदल घडीवल्याचे अनेक प्रसंग आहेत. त्याचप्रमाणे बडबडीत फसव्या घोषणा, आश्वासने देऊन निवडणुकीत विजयाकरीता मतदारांना संभ्रमित करता येते. त्याकरीता पेंशनरांनी, फसव्या बातम्या पासून सावध राहून जो पर्यंत केंद्र सरकार तर्फे पेंशनवाढीची घोषणा होत नाही, तो पर्यंत येत्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचे याचा विचार करावा लागणार आहे असे पेन्शनर संघटनेचे विजय कदम यांनी सांगितले आहे.